पंढरपुरात सुप्रिया स्वधार मोहिमेला सुरवात

पंढरपुरात सुप्रिया स्वधार मोहिमेला सुरवात
Updated on
Summary

या मोहिमेमधून निराधार व गरीब महिलांना संजय गांधी व श्रावण बाळ या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

पंढरपूर (सोलापूर): राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यभरात निराधार, वृध्द, गरीब आणि गरजू महिलांसाठी सुप्रिया स्वधार मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेचा आज पंढरपुरात प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेमधून निराधार व गरीब महिलांना संजय गांधी व श्रावण बाळ या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा राजेश्री ताड यांनी आज या कामासाठी पुढाकार घेवून तालुक्यातील 21 निराधार व गरीब महिलांचे प्रस्ताव तहसीलकार्यालयात सादर केले.

पंढरपुरात सुप्रिया स्वधार मोहिमेला सुरवात
पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गरस्त्याची दुरावस्था; पाहा व्हिडिओ

समाजात अनेक गरीब व निराधार महिला आहेत. अशा महिलांना मदत मिळत नसल्याने त्यांची आर्थिक व मानसिक कुचंबणा होते. ही त्यांची समस्या लक्षात घेवून खासदार सुप्रिया सुळे यांनी अशा महिलांना शासकीय योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत राज्यभरातील महिलांना राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत पंढरपूर तालुक्यातही मोहिम सुरु केली आहे. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष राजेश्री ताड यांनी तालुक्यातील अनेक गावात जावून निराधार आणि गरीब महिलांची माहिती घेवून त्यांचे प्रस्ताव तहसीलकार्यात सादर केले आहेत.

पंढरपुरात सुप्रिया स्वधार मोहिमेला सुरवात
पैठण-पंढरपूर महामार्गावर दर्जाहीन कामामुळे भेगा; गडकरींकडे तक्रार

यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या अवल कारकून एस.बी. कुलकर्णी यांच्याकडे हे प्रस्ताव सादर केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशानुसार निराधार आणि गरीब महिलांना मदत मिळवून देण्यासाठी सुप्रिया स्वधार मोहिम सुरु केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या माध्यमातून योग्य ती मदत केली जाणार आहे. योजनेसाठी पात्र महिलांनी संपर्क साधावा, असे आवाहन राजेश्री ताड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur city
OBC Leader Laxman Hake Alleges Prasad Lad Supports Manoj Jarange Protest Amid Maharashtra Reservation Row
solapur-pune highway
Akkalkot MLA Sachin Kalyanshetti
Marathi News Esakal
www.esakal.com