
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या राज्यभर सदस्य नोंदणी शिबिर हाती घेतले आहे. सदस्य नोंदणीसाठी युवकांनी सर्वतोपरी अथक परिश्रम घ्यावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना संधी दिली जाणार आहे. ही संधी देत असताना युवकांचा प्रामाणिकपणा, जनमानसात असलेले त्याचे स्थान, पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न या मुद्द्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिली.