
मोहोळ (सोलापूर) : शहरासह आसपासच्या परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल सह संशयित चोरास गुुन्हा अन्वेषण पथकाने ताब्यात घेतल्याने चोरीचे अनेक गुुन्हे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, कुरूल रोडवरील बंद टोलनाका येथे एक इसम चोरीची गाडी घेऊन थांबला आहे. तत्काळ सदर ठिकाणी पोलिस पथक गेल्यानंतर मिळालेल्या बातमीनुसार संशयित इसम थांबलेला दिसला. त्याच्याजवळील मोटारसायकलबाबत अधिक चौकशी केली असता त्याने ती चोरून आणल्याचे समजले. पोलिसी खाक्या दाखवत आगाऊ चौकशी केली असता त्याने कुरूल येथे लावलेल्या चोरीच्या इतर पाच मोटरसायकली दाखवल्या.
सदर संशयितास मोटरसायकलसह पोलिस ठाण्यात घेऊन आल्यानंतर मोटारसायकल च्या चोरीचे गुन्हे तपासले असता मोटारसायकल चोरीस गेल्या प्रकरणी फिर्याद दाखल केलेले फिर्यादी अनुक्रमे संदीप प्रभाकर बचुटे (रा. वरकुटे) यांची (एम. एच. 13/ बी. ई. 1236), जकरिया मोहंमद जुबेर शेख (रा. विद्यानगर, कुरुल रोड, गाडी क्र. एम. एच. 13/ एक्यू. 3067) आदीसह इतर मिळून आलेल्या चार मोटारसायकली मिळाल्या. आरोपी दत्तात्रय शिवाजी देवकते (रा. बीबी दारफळ, ता. उत्तर सोलापूर) व गंगाधर विठ्ठल अर्जुन (रा. सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट) यांना मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या आदेशान्वये गुन्हा अन्वेषण पथकातील सहाय्यक पोलिस फौजदार पितांबर शिंदे, पो. कॉ. प्रविण साठे, पो. कॉ. हरिदास थोरात, पो. कॉ. गणेश दळवी यांनी कामगिरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.