Amol Mane
sakal
सोलापूर - हापूसची मधुर चव, केशरचा सोनेरी रंग आणि सेंद्रिय शेतीची जोड...या त्रिसूत्रीचा संगम साधत मोहोळ तालुक्यातील बिटले येथील शेतकरी अमोल माने यांनी ‘सुवर्ण केशर’ नावाने नवा आंबा ग्राहकांसमोर आणला आहे. झाडावर नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या या आंब्याला राज्यातील विविध शहरांत चांगली मागणी मिळत असून, प्रतिकिलो ३०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे.