Solapur News : शेतकऱ्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ स्वाभीमानीचा रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swabhimani rasta roko protest injustice against farmer solapur

Solapur News : शेतकऱ्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ स्वाभीमानीचा रास्ता रोको

मंगळवेढा : तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अॅड राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा विजापूर रोडवरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील शेतकऱ्यांना सत्ता बदलानंतर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक होईना म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेले 50 हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळावे.खरीप 2022 पीक विम्यातील दुसय्रा टप्प्यातील भरपाई रक्कम कमी मिळाली असून पहिल्या टप्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.

ऑक्टोबर 2022 मध्ये सततच्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले. पंचनामा करून सुद्धा आज तागायत त्याची मदत मिळाली नाही ती मदत तात्काळ बॅक खात्यावर जमा करावी.महावितरणने विज पुरवठा दिवसा करून शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना होणारा त्रास बंद करावा.जळालेला ट्रान्सफर तात्काळ भरून मिळावा.

12 डिसेंबर रोजी झालेल्या नुकसानीचे पंचनामा विमा कंपनीने न करता त्या तक्रारी परस्पर निकाली काढल्या.त्या प्रकरणी चौकशी करून वंचीत शेतकऱ्याला भरपाई अदा करावी.पंचायत समितीकडून मनरेगाच्या चार लाख अनुदानाच्या विहिरीच्या कामाला मंजुरी देण्याबाबत व कृषी खात्याकडून शेततळ्याच्या कामाला मंजूर द्यावी.

या मागण्याचा समावेश होता. तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार,तालुका संघटक शंकर संघ शेट्टी, संतोष सोनगे, तालुका कार्याध्यक्ष आबा खांडेकर अर्जुन मुद्गुल हरी घुले रोहित गवळी ज्ञानेश्वर पवार संतोष हेंबाडे, रावसाहेब सपंगे संजय चौगुले प्रदीप लिगाडे बसवराज नांगरे सिद्धराम होटगी महादेव येडगे महादेव बुधाळकर अप्पू दुर्गे जयसिंग घुले प्रभू शिंदे व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

नियमित कर्जदारांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा सरकारने करून सहा महिने झाले तरी सुद्धा तालुक्यातील अनेक शेतकरी प्रोत्साहन पर अनुदानापासून वंचित आहेत. प्रोत्साहन पर अनुदानासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली.अशी घोषणा केली त्याच्या जाहिरात बाजीसाठी कोट्यावधी रुपये चा खर्च केला पण आजही बळीराजा प्रोत्साहन पर अनुदानापासून वंचित आहे.

युवराज घुले , जिल्हा संघटक

टॅग्स :SolapurFarmersolapur city