

Solapur
esakal
पंढरपूर: तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथे रविवारी (ता. १४) विहिरीत छोटा हत्ती कोसळून भीषण अपघात झाला होता. याप्रकरणी पुणे येथील रोडवेज कंपनीचे प्रमुख नवज्योत गडोख (रा. पुणे) यांच्यासह रोडच्या कामात सहभागी असणाऱ्या संबंधितांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा व निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
याप्रकरणी सिद्धेश्वर पोपट जाधव (रा. स्वामी विवेकानंद नगर, पंढरपूर) यांनी वेळापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंढरपूर येथील बावचे -सातोरे व चौगुले कुटुंबातील एकूण १६ जण चार चाकी वाहनातून (छोटा हत्ती, एम एच-१३ डी.क्यु- ६३३५) मधून म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते.