शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत "हा' आहे खोडा 

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत "हा' आहे खोडा 
Updated on

सोलापूर ः शासनाने महिला शिक्षिकांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून सात सप्टेंबर 2018 ला शुद्धीपत्रक काढले आहे. त्यानुसार ज्या महिला शिक्षिकांचे आई-वडील, सासू-सासरे गंभीर आजाराने आजारी आहेत किंवा वार्धक्‍याने आजारी आहेत, अशा शिक्षिकांच्या बदलीसाठी लागणाऱ्या अटी शिथिल केल्या होत्या. शुद्धीपत्रकात 12 व 13 क्रमांकाचा प्राधान्यक्रम त्यासाठी दिला होता. परंतु, ऑनलाइन प्रणालीत प्राधान्यक्रमाचा विकल्पच नमूद केला नसल्याचा फटका या महिला शिक्षिकांना बसणार आहे. 

शुद्धीपत्रकातील प्राधान्यक्रम नसल्यामुळे अनेक शिक्षकांना ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही. ऑनलाइन अर्जात प्राधान्यक्रम भरता न आल्यास अनेक महिला शिक्षिकांना कुटुंबातील आजारी सदस्यांची काळजी घेता येणार नाही. 17 जानेवारीपासून शिक्षक आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक चारची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये शिक्षकांना ऑनलाइन माहिती भरण्यास सांगितले आहे. विशेष संवर्ग एक, संवर्ग दोन, सर्वसाधारण संवर्ग, एकतर्फी नाहरकत प्रमाणपत्र यासाठी शिक्षकांनी ऑनलाइन प्रणालीत 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरायचे आहेत. ही प्रक्रिया 24 एप्रिल 2017 च्या शासन निर्णयानुसार चालू आहे. 

शासनाने कर्मचाऱ्यांचे अतिगंभीर आजार, त्यांच्या पाल्यांचे आजार लक्षात घेऊन विशेष संवर्ग एकमध्ये प्राधान्यक्रम दिलेला आहे. परंतु, ज्या शिक्षिकांचे आई-वडील, सासू-सासरे गंभीर आजाराने आजारी, वार्धक्‍याने आजारी आहेत, अशा महिला कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन ऑनलाइन बदली प्रक्रियेत शासनाच्या सात सप्टेंबर 2018 च्या शुद्धीपत्रकानुसार संवर्ग एक अंतर्गत विकल्प उपलब्ध व्हावा, यासाठी विनंती केली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने व शिक्षक संघटनांनीही सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची व मुदत संपण्याआधी विकल्प ऑनलाइन प्रणालीत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आवाहनही त्या महिलांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com