शिक्षकांना हवे आधुनिकतेचे व्हिजन : रणजितसिंह डिसले गुरुजी यांचे "कॉफी विथ सकाळ' मध्ये प्रतिपादन 

Rajit Sing Disle Guruji.jpeg
Rajit Sing Disle Guruji.jpeg

सोलापूर : 19 व्या शतकात बनविलेला अभ्यासक्रम विसाव्या शतकातील शिक्षक 21 व्या शिक्षकातील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. विद्यार्थ्यांना दिले जाणारे ज्ञान हे अकाराव्या शतकातील आहे. त्याऐवजी 2050 मधील भारताचा विचार करून नवं शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे, याकरिता 21 व्या शतकातील शिक्षकांकडे आधुनिकतेचे व्हिजन हवे, अशी अपेक्षा ग्लोबज टिचर रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी व्यक्‍त केली. "सकाळ' कार्यालयात "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात ते बोलत होते. 
प्रारंभी "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी "सकाळ'चा दिवाळी अंक देऊन रणजितसिंह डिसले यांचे स्वागत केले. यावेळी डिसले गुरुजी यांनी आपला लोकल ते ग्लोबल प्रवास उलघडला. माझे ज्ञान माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांपुरते न राहता ते जगभरातील विद्यार्थ्यांना मिळावे, याकरिताच स्वत:ला मिळालेल्या सात कोटीतील साडेतीन कोटी रुपये स्पर्धकांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

कलासंगत शिक्षणाची गरज 
भविष्यातील शिक्षक स्वत:ची वेगळी अध्यापन कौशल्ये असणारा असावा. नव्या अभ्यासक्रमात कोडिंग प्रोग्रॅमिंग हा अभ्यासक्रमाचा समावेश असायला हवा. तंत्रज्ञान हे सतत भविष्याचा वेध घेणारे असते. क्‍युआर कोडसह शालेय अभ्यासक्रम तयार केल्याचा उपयोग कोरोनाच्या काळात झाला. कोणतेही तंत्रज्ञान हे दुधारी आहे. याचा विचार करून शिक्षणात बदल करण्यात यावेत. मोबाईल व संगणकाचा वापर मुलांना करता आलाच पाहिजे. नवे तंत्रज्ञान मुलांना मिळणे आवश्‍यकच आहे, यासाठी कालसंगत शिक्षणाची गरज आहे. भविष्यातील शिक्षक हा आपलं वेगळंपण जपणारा असावा. 

धोरणात्मक बदलासाठी कृती आराखडा 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला तुमचे ज्ञान तुमच्या शाळेपुरते न राहता पूर्ण राज्याला व्हावे, यासाठी शिक्षण क्षेत्रातील अपेक्षित बदल काय असावेत, याबद्दलच्या माझ्या ग्राउंड लेवलच्या अनुभवानुसार सर्व कल्पना अहवाल रुपाने मागवल्या आहेत. 27-28 जानेवारीपर्यंत त्या शिक्षणमंत्र्यांना सादर करावयाच्या आहेत. याची अंमलबजावणी शिक्षणमंत्र्यांकडून धोरणात्मक बदलासाठी होणार असून याबाबतचा कृती आराखडा मांडला जाईल. यात नक्कीच अपेक्षित बदल असतील. 

नव्या शैक्षणिक धोरणात अमुलाग्र बदल 
सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. मात्र, डीएडच्या अभ्यासक्रमात व्हर्च्युअल शिक्षण देण्याबाबत काहीच समावेश नाही किंवा शिक्षकांनाही ऑनलाइन शिक्षण देण्याबद्दल कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. शिक्षकांना आधुनिक शिक्षणासाठी प्रशिक्षित करण्याची आवश्‍यकता आहे. सध्याच्या शिक्षणपद्धती नव्या विचाराला स्थान नाही. त्याऐवजी वेगळा विचार करणारी नवं मत मांडणास प्रवृत करणारी शिक्षणपद्धती आवश्‍यक आहे. वेगळा विचार करणाऱ्या माणसाला सध्या किंमत नाही. स्वत: मधील प्रतिभा ओळखून नवी मांडणी करणारे विद्यार्थी घडवले जातील, अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे. 

लैंगिक शिक्षणाचीही गजर 
विशिष्ट वयात होणारे शारीरिक बदल नेमके काय आहेत. किशोर अवस्थेततील बदलत्या भावना याची ओळख मुलांना होणे आवश्‍य आहे. मात्र, हा विषय संस्कृतीविरुद्ध जातो, म्हणून लैंगिक शिक्षणाला विरोध केला जातो. यासंदर्भातील चर्चेला नेहमी बगल दिले जाते व हा मुद्दा बाजुला ठेवला जातो. मात्र, यामुळे मुलं चुकीच्या मार्गाचा अवलंब करुन ही माहिती मिळवतात. यामुळे यासदर्भांतील योग्य माहिती व शास्त्रिय पद्धधतीने योग्य तो संदेश अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच मुलांना मिळणे आवश्‍यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांना योग्य त्या वयातच लैंगिक शिक्षण मिळण्याची गरज आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com