कोरोना ड्यूटी नाकारणारे शिक्षक बिनपगारी !

कोरोना सर्व्हेची ड्यूटी नाकारणाऱ्या शिक्षकांना वेतन नाकारण्यात आले आहे
Corona Duty
Corona DutyGoogle

सोलापूर : आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत (Disaster Management Act) शिक्षकांना शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे (Corona Survey) करणे बंधनकारक आहे. महापालिका आयुक्‍तांनी आदेश देऊनही ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या 37 शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यातील 15 शिक्षक आता रुजू झाले असून उर्वरित शिक्षकांनी अजूनही ड्यूटी जॉईन केली नाही. त्यामुळे त्यांना वेतन देऊ नये, असे आदेश आता महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून (General Administration Department of the Municipal Corporation) काढले जात आहेत.

Corona Duty
तिसऱ्या लाटेची शक्‍यता ! गरोदर माता व बालकांची घ्या कोरोनापासून "अशी' काळजी

कोरोनाची (Covid-19) लाट आटोक्‍यात यावी या हेतूने शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला जात आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शिक्षकांची मदत घेतली जात आहे. परंतु, कोरोनाचा सर्व्हे करताना 50 ते 55 वर्षांवरील शिक्षक, को-मॉर्बिड शिक्षकांसह दिव्यांग, 20 व 40 टक्‍क्‍यांवरील शिक्षक, शिक्षणसेवक, गर्भवती महिला शिक्षिकांना कोरोना ड्यूटीतून सवलत देण्यात आली आहे. शहरात एकाचवेळी एक हजार 50 शिक्षक प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करीत आहेत. सर्व्हेसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या जवळपास अडीच हजार शिक्षकांची मदत घेतली जात आहे. कोरोना सर्व्हे अथवा कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगचे काम करताना मयत झालेल्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास शासनाकडून 50 लाखांचे विमा कवच दिले जात आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव 30 जूनपर्यंत पाठवावा लागणार असून, त्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.

Corona Duty
ग्रामीण ढंगातील कृषी उपक्रमांमुळे बासलेगावच्या कृषी पर्यटन केंद्राकडे पर्यटकांचा ओढा

मदतीचा प्रस्ताव मात्र पाठविलाच नाही

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घरोघरी जाऊन सर्व्हे करणारे 32 शिक्षक कोरोनाबाधित झाले (30 मार्च 2021 पासून) असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश देणाऱ्या महापालिका प्रशासनाने मयत शिक्षकांच्या मदतीचा प्रस्ताव अजूनही पाठविलेला नाही. दरम्यान, प्रस्ताव पाठविण्याची मुदत शासनाने 30 जूनपर्यंत वाढविल्याने आता त्यांचा मदतीचा प्रस्ताव पाठविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला जात आहे. 30 मार्चपासून आतापर्यंत जवळपास 30 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील दोन शिक्षक व एका लिपिकाचा मृत्यू झाला आहे. आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

- कादर शेख, प्रशासनाधिकारी, सोलापूर महापालिका

467 पैकी 79 शिक्षकांचा ड्यूटीसाठी नकार

शहरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्‍तीची माहिती घेत असताना प्रत्येक सदस्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात असून त्यांची ऑक्‍सिजन लेव्हलही तपासली जात आहे. प्रत्येक शिक्षकास किमान 30 ते 35 दिवसांची ड्यूटी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शिक्षकांना सर्व्हेचे काम करावे लागते. महापालिकेने 467 शिक्षकांना ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश काढले. मात्र, त्यापैकी 79 शिक्षकांनी ड्यूटी रद्द करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यात 17 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह असून, सहा शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित असल्याची कारणे देण्यात आली आहेत. तर उर्वरित शिक्षकांनी आजारपणासह अन्य कारण देऊन ड्यूटी रद्दची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com