Solapur News : बीआरएस मायभूमी, भाजप कर्मभूमी भाजपच्या माजी नगरसेवकांनी मांडली भूमिका

केसीआर यांनी दिली युवा नेतृत्वासाठी वल्याळ, पाटील, शेजवाल, भोसले, रिकमल्ले यांना ऑफर
Telangana CM K Chandrasekhar Rao offered four former BJP corporators along with Nagesh Valyal to join brs youth leadership politics
Telangana CM K Chandrasekhar Rao offered four former BJP corporators along with Nagesh Valyal to join brs youth leadership politicssakal

सोलापूर : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्यासह भाजपमधील चार माजी नगरसेवकांना युवा नेतृत्व म्हणून ‘बीआरएस’मध्ये येण्याची ऑफर दिली.

मात्र बीआरएस मायभूमी असली तर भाजप आमची कर्मभूमी आहे, त्यामुळे घाईगडबडीत कोणताच निर्णय घेणे योग्य नाही, निर्णय कळविण्यास वेळ मागितल्याची भूमिका नागेश वल्याळ यांनी मांडली.

तेलंणगचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ गेले दोन दिवस जिल्ह्यात तळ ठोकून होते. बीआरएसचे मंत्रिमंडळ सोलापूर जिल्ह्यातील युवा नेतृत्वाच्या शोधात आहेत.

Telangana CM K Chandrasekhar Rao offered four former BJP corporators along with Nagesh Valyal to join brs youth leadership politics
Solapur Crime : मोहोळमध्ये सत्तर वर्षीय आजीने घेतला गळफास, तर...

सोलापूर जिल्ह्यात तेलुगु भाषिकांची संख्या अधिक असल्याने बीआरएसच्या राजकीय विस्तारीकरणाचा मार्ग सुकर आहे. त्यासाठी सक्षम युवा नेतृत्वाच्या शोधात बीआरएसची नेतेमंडळी ॲक्टिव्ह झाली आहेत.

सोमवारी अर्थमंत्री हरीश राव, पर्यावरणमंत्री श्रीनिवास गौड आणि ऊर्जामंत्री जगदीश्वर रेड्डी यांनी सोमवारी (ता. २६) सायंकाळी वल्याळ यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

Telangana CM K Chandrasekhar Rao offered four former BJP corporators along with Nagesh Valyal to join brs youth leadership politics
Solapur : महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? दहा पदाधिकाऱ्यांच्या निवडी, जातीय समिकरणाची जुळवाजुळव

आज (मंगळवारी) दुपारी चार वाजता केसीआर हे नागेश वल्याळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन वल्याळ यांच्यासोबत हजर असलेले माजी नगरसेवक सुरेश पाटील, सुभाष शेजवाल, श्रीनिवास रिकमल्ले, संतोष भोसले यांच्याशी बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली.

यावेळी शहरातील उद्योग-व्यवसाय, मूलभूत सुविधा, स्थानिक समस्या जाणून घेतल्या. बीआरएसला सोलापुरात युवा नेतृत्वाची गरज आहे.

त्यासाठी या नगरसेवकांना बीआरएसमध्ये यावे, अशी थेट ऑफर देण्यात आली. मात्र या नेत्यांनी सावध भूमिका घेत शहरातील एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय कळविणार असल्याचे सांगितले.

बीआरएस आमची मायभूमी आहे, तर भाजप कर्मभूमी आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून आम्ही भाजपमध्ये एकनिष्ठ राहून काम केल्यामुळे निर्णय कळविण्यासाठी अवधी मागितल्याचेही श्री. वल्याळ यांनी सांगितले.

Telangana CM K Chandrasekhar Rao offered four former BJP corporators along with Nagesh Valyal to join brs youth leadership politics
Solapur News : पंढरपुरात भालकेंचा प्रवेश, सोलापूर शहरात चाचपणी; भाजप-काँग्रेसच्या १४ माजी नगरसेवकांशी संपर्क

महापालिकेत १९ तेलुगु भाषिक नगरसेवक

महापालिकेत भाजप, कोठे गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांतील साधारण १९ नगरसेवक हे तेलुगु भाषिक आहेत. त्यांची मायभूमी तेलंगण आणि कर्मभूमी सोलापूर आहे. बीआरएस पक्षाने सोलापुरात येण्यापूर्वी माजी महापौर धर्मण्णा सादूल यांना ऑफर दिली.

त्यानंतर महेश कोठे यांनादेखील पक्षात येण्याबाबत कळविले. मात्र कोठे यांनी आमदारकीचा प्रस्ताव समोर आणल्याने या विषयाला पूर्णविराम मिळाला. दोन्ही देशमुखांच्या राजकारणात होरपळून निघालेल्या भाजपमधील माजी नगरसेवकांसमोर पक्षात येण्याचा प्रस्ताव ठेवत केसीआर यांनी एक नवा पर्याय उभा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com