
सांगोला : अनोळखी व्यक्तीने टेंभू योजनेच्या कालव्याचे गेट बंद केल्याने पाणी तुंबल्याने निर्माण झालेल्या फुगवट्यामुळे कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना हटकर मंगेवाडी (ता. सांगोला) येथे मंगळवारी १ घडली. या घटनेत कालवा उघडल्याने शासनाचे तब्बल ५५ लाख रुपयांचे तर या परिसरातील शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आली आहे.