सांगोला - टेंभू योजनेतून सांगोला तालुक्यातील माण नदीला पाणी सोडावे आणि नदीवर असणारे सर्व बंधारे भरून द्यावेत. या मागणीसाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकतीच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावर संबंधित विभागाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.