टेंभुर्णी - टेंभुर्णीतील राष्ट्रीय धनुर्धर कु. गाथा दिपाली आनंदराव खडके हिची कॅनडा येथे होणाऱ्या वर्ल्ड आर्चरी युथ चॅम्पियन्सशिप 2025 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गाथा खडके हिची पुणे येथील आर्मी स्पोर्ट इन्स्टिटय़ूटच्या मैदानावर झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकाविल्याने तिची या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. 17 ते 24 ऑगस्ट 2025 दरम्यान विनिपेग कॅनडा येथे ही स्पर्धा होणार आहे.