esakal | टेंभुर्णी पोलिसांनी घेतले गांजा प्रकरणातील फरार आरोपीला तेलंगणातून ताब्यात !
sakal

बोलून बातमी शोधा

Hemp

टेंभुर्णी पोलिसांना पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कारमधून अवैधरीत्या गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती 27 नोव्हेंबर रोजी मिळाली होती. त्यामुळे रविवारी (ता. 6) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर- पुणे महामार्गावर वरवडे टोल नाक्‍याजवळ टेंभुर्णी पोलिस व महामार्ग सुरक्षा पथकाचे कारवाई करण्यासाठी थांबले होते. समोर पोलिस असल्याचे दिसताच कारचालक कारचा दरवाजा उघडून मागील बाजूने पळून गेला होता. 

टेंभुर्णी पोलिसांनी घेतले गांजा प्रकरणातील फरार आरोपीला तेलंगणातून ताब्यात !

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : सोलापूर - पुणे महामार्गावर वरवडे टोल नाक्‍याजवळ टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व त्यांचे सहकारी तसेच मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई करून कारमधून अवैधरीत्या गांजा विक्रीसाठी घेऊन जात असलेला सुमारे 21 लाख 41 हजार 220 रुपये किमतीचा माल पकडला होता. या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपीला टेंभुर्णी पोलिसांनी तेलंगण राज्यातून ताब्यात घेऊन अटक केली असून, त्यास न्यायालयाने शुक्रवार (ता. 11) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

टेंभुर्णी पोलिसांना पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कारमधून अवैधरीत्या गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती 27 नोव्हेंबर रोजी मिळाली होती. त्यामुळे रविवारी (ता. 6) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर- पुणे महामार्गावर वरवडे टोल नाक्‍याजवळ टेंभुर्णी पोलिस व महामार्ग सुरक्षा पथकाचे कारवाई करण्यासाठी थांबले होते. समोर पोलिस असल्याचे दिसताच कारचालक कारचा दरवाजा उघडून मागील बाजूने पळून गेला होता. नंतर पोलिसांनी कारसह 36 लाख 41 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला होता. 

टेंभुर्णी पोलिसांनी फरार कार चालकाच्या शोधासाठी विशेष पथक तयार करून कारमध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरून तेलंगण राज्यातील निरकुला मंडल, आत्मकुमर (जि. वरंगळ) येथून संशयित आरोपी राजकुमार बसवय्या अर्शराम (वय 26) यास पकडून अटक केली. नंतर सोमवारी (ता. 7) माढा न्यायालयात हजर केले असता माढा न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top