
टेंभुर्णी : टेंभुर्णी एमआयडीसीतील केळी पॅकेजिंग मटेरिअल बनविणाऱ्या श्रीकृष्ण एक्स्पोर्ट कंपनीस सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागून फोम व पॅकेजिंगचे कच्चे व पक्के मटेरिअल, मशिनरी, संगणक आदी साहित्य जळून भस्मसात झाले. या आगीमध्ये अंदाजे १२ ते १५ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवित हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.