ग्रामीणमध्ये शुक्रवारपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाउन !

ग्रामीणमध्ये बुधवारपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाउन
लॉकडाउन
लॉकडाउनEsakal

सोलापूर : ग्रामीण भागात कडक संचारबंदीनंतर (23 एप्रिल ते 18 मे) तब्बल 47 हजार रुग्ण वाढले आहेत. तर आठशेहून अधिक कोरोना (Covid-19) रुग्णांचा मृत्यू झाला असून ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. लॉकडाउनपूर्वी (Lockdown) उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ग्रामीणमध्ये आठ हजार 373 होती. आता 17 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही चिंताजनक परिस्थिती बदलावी या हेतूने 21 मे ते 1 जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी घेतला आहे. (Ten days of strict lockdown in Solapur rural areas from Friday)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी व्हावा या हेतूने राज्य सरकारने "ब्रेक द चेन'अंतर्गत 23 एप्रिलपासून कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. कडक संचारबंदीला आता 26 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आटोक्‍यात आलेली नाही. चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय असून त्यात पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, माळशिरस, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, माढा या तालुक्‍यांचा समावेश आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍याचा मृत्यूदर सर्वाधिक असून तरुण रुग्ण कोरोनाचे बळी ठरत आहेत. तरीही, नियमांचे उल्लंघन करीत गावोगावी फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवे आदेश काढत दहा दिवसांचा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना काळात 220 झोपडपट्ट्यांमधील 39 हजार कुटुंबांकडे महापालिकेचे दुर्लक्ष !

लॉकडाउन
दुसरा डोस कधी घ्यायचा? दोन डोसमधील अंतर वाढत असल्याने संभ्रम

आदेशातील ठळक बाबी...

  • सर्व किराणा दुकाने, किरकोळ, ठोक विक्रेते, व्यापाऱ्यांसह सर्व दुकाने राहणार बंद

  • किराणा माल, भाजीपाला, फळविक्री, पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थाच्या दुकानदारांना सकाळी सात ते अकरापर्यंत देता येईल घरपोच सेवा

  • कृषी अवजारे, शेती उत्पादनाशी संबंधित दुकाने, कृषी सेवा केंद्रे सकाळी सात ते अकरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

  • उपहारगृहे, लॉज, हॉटेल, मॉल, बाजार, मार्केटसह वाईन शॉप, बिअरबार, देशी दारू दुकानेही राहणार बंद; घरपोच सेवांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृहांना परवानगी

  • कृषी उत्पन्न बाजार समिती, बेकरी, किरकोळ व ठोक विक्रीची दुकाने, आठवडी व दैनंदिन बाजारालाही परवानगी नाही

  • धार्मिक प्रार्थनास्थळे, सिनेमागृहे, नाट्यगृहे व सभागृहे, गेम पार्लरही राहणार बंद

  • शाळा, महाविद्यालये, जल क्रीडा स्थळे, केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर उघडली जाणार नाहीत

  • रुग्णालये, लसीकरण केंद्रे, औषध दुकाने, औषध कंपन्या, आरोग्य सेवा पुरविणारी उपकरणे व त्या सेवांना कच्चा माल पुरविणाऱ्यांना परवानगी

  • घरपोच दूध वितरणास सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत परवानगी; सवलत दिलेल्यांकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक

लॉकडाउन
220 झोपडपट्ट्यांमधील 39 हजार कुटुंबांकडे महापालिकेचे दुर्लक्ष!

अगोदर सूचना मग काढले आदेश

शहरातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून ग्रामीणमध्ये रुग्णांबरोबरच मृत्यूदरही वाढत आहे. कोरोनाची लाट रोखण्यासाठी उशिरा का होईना, पण जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीणसाठी स्वतंत्र आदेश काढले. तत्पूर्वी, अचानक आदेश काढल्यानंतर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सोमवारी (ता. 17) रात्री उशिरा प्रसिद्धिपत्रक जाहीर केले. त्यानुसार आता उद्या (बुधवारी) आदेश काढून शुक्रवारपासून (ता. 21) त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com