esakal | शहरातील एक हजार 458 जणांची टेस्ट! आज 'या' नगरांमधील 38 जण पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona-positive-1585803595.jpg

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील 58 हजार 210 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरात सापडले आतापर्यंत सहा हजार 382 रुग्ण; 403 जणांचे मृत्यू 
  • एकूण रुग्णांपैकी चार हजार 944 जणांनी केली कोरोनावर मात 
  • आज शहरात सापडले 38 रुग्ण; शुक्रवार पेठ, हत्तुरे वस्तीतीत दोघांचा मृत्यू 
  • सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक हजार 35 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

शहरातील एक हजार 458 जणांची टेस्ट! आज 'या' नगरांमधील 38 जण पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा मृत्यू 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असून आज एक हजार 458 जणांपैकी 39 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. शुक्रवार पेठेतील 62 वर्षीय पुरुषाचा, तर हत्तुरे वस्ती परिसरातील ओम नम:शिवाय नगरातील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरातील रुग्णालयांमधून आज 88 रुग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील 58 हजार 210 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरात सापडले आतापर्यंत सहा हजार 382 रुग्ण; 403 जणांचे मृत्यू 
  • एकूण रुग्णांपैकी चार हजार 944 जणांनी केली कोरोनावर मात 
  • आज शहरात सापडले 38 रुग्ण; शुक्रवार पेठ, हत्तुरे वस्तीतीत दोघांचा मृत्यू 
  • सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक हजार 35 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

विजयपूर नाका, फॉरेस्ट, मुस्लिम पाच्छा पेठ, सिध्देश्‍वर पेठ, विष्णू मिल चाळ, मरिआई चौक, शिवाजी नगर (केगाव), न्यू पाच्छा पेठ, जवान नगर, रत्नमंजिरी नगर, रोहिणी नगर, आदित्य नगर, कुबेर नगर (विजयपूर रोड), कृष्णा कॉलनी, शिवयोगी नगर, सिध्दरामेश्‍वर नगर (जुळे सोलापूर), भवानी पेठ, साईबाबा चौक (सत्तरफूट रोड), घोंगडे वस्ती (भवानी पेठ), विमानतळ, रोहन पार्कजवळ (धनश्री नगर), अरसिन अर्पाटमेंट (मोदीखाना), वसंत विहार, धमश्री लाईन, नवी पेठ, पोलिस लाईन (केशव नगर), दक्षिण सदर बझार, डोणगाव रोड, ब्रह्मदेव नगर, शुक्रवार पेठ, कुमारस्वामी नगर (शेळगी), वेदांत नगर याठिकाणी आज नवे रुग्ण आढळले आहेत.न्यू पाच्छा पेठेतील रुग्ण कायम
शहरात 12 एप्रिलला पहिला रुग्ण न्यू पाच्छा पेठेत सापडला. त्यानंतरही या भागातील कोरोनाचा संसर्ग कमी झालेला दिसत नाही. आज सापडलेल्या 38 रुग्णांमध्ये सर्वाधिक चार रुग्ण सापडले आहेत. शेळगीतील कुमारस्वामी नगर, पोलिस लाईन, धनश्री नगर, विमानतळ (केशव नगर) येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.

loading image
go to top