विमानतळ बंद, मीटर चालू! नेत्यांच्या सेवेवर दोन कोटी खर्च

विमानतळ बंद, मीटर चालू! सोलापुरात येणाऱ्या नेत्यांच्या सेवेवर दोन कोटी खर्च
विमानतळ बंद, मीटर चालू! सोलापुरात येणाऱ्या नेत्यांच्या सेवेवर दोन कोटी खर्च
विमानतळ बंद, मीटर चालू! सोलापुरात येणाऱ्या नेत्यांच्या सेवेवर दोन कोटी खर्चCanva
Summary

विमानसेवा बंद असली तरी विमानतळ चालू ठेवण्यासाठी केंद्र शासन वर्षाकाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करत आहे.

सोलापूर : स्मार्ट सोलापुरातील (Smart Solapur) होटगी रोड विमानतळ (Hotgi Road Airport) केवळ व्हीआयपी (VIP) व्यक्‍तींचे विमान उतरविण्यासाठी उपयोगात येत आहे. विमानसेवा बंद असली तरी विमानतळ चालू ठेवण्यासाठी केंद्र शासन वर्षाकाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करत आहे. आतापर्यंत इमारत सुशोभीकरणावर 50 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विमानसेवा बंद मात्र कोट्यवधींचा खर्च चालू आहे, तर शासनाने प्रवासी सेवा सुरू करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

विमानतळ बंद, मीटर चालू! सोलापुरात येणाऱ्या नेत्यांच्या सेवेवर दोन कोटी खर्च
कांद्याला 2150 रुपये दर! सोलापूर बाजार समितीत 123 गाड्यांची आवक

होटगी रोड विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीला 40 वर्षे पूर्ण झाली. तीन राज्यांना जोडणाऱ्या सोलापूर शहरातील उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने विमानसेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होटगी रोड विमानतळ असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती बनली आहे. या 40 वर्षांच्या कालावधीतील 2009 ते 10 हा एक वर्षाचा कालावधी वगळता आतापर्यंत व्हीआयपी व्यक्‍तींच्या सेवेसाठीच हे विमानतळ सुरू आहे. केंद्रीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या पथकाने प्रवासी सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने पंधरा वेळा विमानतळाची पाहणी केली. प्रवासी सेवेसाठी आवश्‍यक असलेला रन-वे, परिसरात वसलेल्या लोकवस्तीची उंची, विमानतळावरील सुविधा या सर्वच गोष्टींचा बोजवारा उडाल्याचे पथकाने निदर्शनास आणून दिले. पाहणी दरम्यान प्राधिकरण पथकाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता वेळोवेळी शासनाकडून करण्यात आली, मात्र राजकीय इच्छाशक्‍ती अभावी विमानसेवा बंदच राहिली. आता गेल्या सहा वर्षांपासून श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी ही विमानसेवेसाठी मुख्य अडसर बनली आहे. चिमणी आहे तोपर्यंत प्रवासीसेवा नाहीच, असा अभिप्राय विमान प्राधिकरणाचा असल्याने प्रवासी सेवेचा विषय बारगळला आहे. मात्र व्हीआयपी व्यक्‍तींच्या स्वागतासाठी कोट्यवधींचा खर्च सुरू आहे.

केंद्रीय प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटी

  • श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी

  • विमानतळ बाजूच्या परिसरातील लोकवस्तीतील इमारतींची अधिक उंची

  • विमानतळ सुरक्षा भिंतीची उंची व सुरक्षा रक्षक

  • नाईट लॅंडिंग

  • रन-वेची लांबी व रुंदी

  • इतर मूलभूत सुविधा आदी 18 त्रुटी नोंदविल्या आहेत.

थोडक्‍यात पण महत्त्वाचे

  • होटगी रोड विमानतळासाठी 1953 मध्ये भूसंपादन प्रक्रिया

  • एकूण परिक्षेत्र 365 एकर, 70 एकरावर अतिक्रमण

  • रन-वे : 2100 मीटर

  • अधिकाधिक 72 सीटर प्रवासी विमान उतरण्याची क्षमता

  • विमानतळाचे प्रत्यक्ष काम 1983 मध्ये पूर्ण

  • 1985 मध्ये वायुदूत नावाची विमानसेवा चालू झाली ती महिन्यापुरतीच

  • त्यानंतर 25 वर्षांनी 2009 ते 10 या कालावधीत प्रवासी सेवा सुरू झाली, तीही वर्षभरापुरतीच

वीजबिल, विमानसेवेसाठी असलेले तांत्रिक, इंटर्नल वायरलेस सिस्टिम, इंटरनेट, कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा आदी देखभाल- दुरुस्तीवर वर्षाकाठी तब्बल दोन कोटींचा खर्च होतो. नुकतेच 2017 मध्ये 15 कोटी रुपये खर्चून इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यापूर्वीची आकडेवारी आपणास माहीत नाही.

- हिमांशू वर्मा, व्यवस्थापक, होटगी रोड विमानतळ

बातमीदार : प्रमिला चोरगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com