
दोन कंटेनरच्या मध्यभागी कार चक्काचूर! खोपोलीजवळ सोलापुरातील चौघांचा मृत्यू
सोलापूर : खोपोली घाट रस्त्यावरील क्रमांक एकवर टायर फुटल्याने एक कंटेनर उभा होता. त्या मार्गावरील वाहतूक स्लो झाली होती. त्याचवेळी ब्रेक फेल झालेला कंटेनर वेगाने येत होता. काळ पुढे दबा धरून उभा असल्याची कोणतीही कल्पना नसलेल्या कारला त्या कंटेनरने मागून जोरात धडक दिली. तीन नंबर लेनवरून त्यांची कार एक नंबरवर थांबलेल्या कंटेनरला धडकली. त्याचवेळी ब्रेक फेल झालेला कंटेनरने त्या कारला मागून जोरात धडक दिली आणि त्यात कारचा जागीच चक्काचूर झाला.
हेही वाचा: SSC, HSC Exam : पेपरसाठी साडेतीन तास वेळ, परीक्षा त्यांच्याच शाळेत
मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारला कंटेनरची जोरात धडक बसली. त्या अपघातात कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, सौरभ तुळसे, सिध्दार्थ राजगुरु (तिघेही रा. बुध्द नगर, फॉरेस्ट) व तुळजापुरातील कदम अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. घाट रस्त्यावर टायर फुटल्याने पूर्वीपासूनच एक कंटेनर रस्त्यावर उभा होता. तो एक नंबर लेनवर उभा होता आणि अपघात झालेली स्विफ्ट कार तीन नंबर लेनवरून जात होती. त्याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला. त्याने त्या स्विफ्ट कारला जोरात धडक दिली. त्यामुळे तीन नंबर लेनवरून ती कार एक नंबर लेनवर आली आणि त्याठिकाणी उभा असलेल्या कंटेनरला मागून धडकली. तेवढ्यात मागून येणाऱ्या कंटेनरने पुन्हा एकदा जोरात धडक दिली आणि त्यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भयानक होता की, कारच्या एअर बॅगदेखील बाहेर आल्या नाहीत. समोरील कंटेनर आणि मागून आलेल्या कंटेनर, यांच्या मध्यभागी कार अडकली आणि ती चक्काचूर झाली, अशी माहिती स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर. वारे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.
हेही वाचा: पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी पावणेदोन कोटींचा निधी
पोलिस निरीक्षक वारेंनी सांगितली हकीकत...
- खोपोली, भोर घाटातील रस्त्यावर एक कंटेनर टायर फुटल्याने उभा होता.
- रस्त्यावरील वाहतूक स्लो होती; त्याचवेळी मागून येत असलेल्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला
- कंटेनरने स्विफ्ट कारला मागून जोरात धडक दिली; कार पुढे उभा असलेल्या कंटेनरला धडकली
- ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने कारला मागून धडक दिल्याने कारचे बोनेट मागील डिकीपर्यंत आले होते
- एअर बॅगदेखील उघडल्या नाहीत; चौघांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांना खोपोली नगरपरिषदेच्या दवाखान्यात नेले आहे
- कंटेनरला मागून तीन गाड्या धडकल्या; त्या स्विफ्ट कारसमोरील एका चारचाकीतील तिघांचा जीव वाचला, पण ते गंभीर जखमी झाले
Web Title: The Car Smashed Into The Middle Of Two Containers Four Killed In Solapur Near
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..