कोरोना अंगावर काढू नका! 23 वर्षीय तरुणीची नऊ दिवसांची झुंज संपली | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona
कोरोना अंगावर काढू नका! 23 वर्षीय तरुणीची नऊ दिवसांची झुंज संपली

कोरोना अंगावर काढू नका! 23 वर्षीय तरुणीची नऊ दिवसांची झुंज संपली

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचे (Covid-19) संकट अजूनही संपले नसून, सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व मास्कचा वापर करणे आवश्‍यक आहे. तरीही, अनेकजण लक्षणे असतानाही आजार अंगावर काढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खंडाळी (ता. माळशिरस) (Malshiras) येथील 23 वर्षीय तरुणीचा रविवारी (ता. 21) कोरोनामुळे मृत्यू झाला. 13 नोव्हेंबरपासून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची नऊ दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली.

हेही वाचा: एसटी महामंडळ 'या'मुळे खड्ड्यात! 700 बस खरेदीची निविदा

कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात आली आहे, परंतु संशयितांच्या टेस्टिंगचे प्रमाण खूपच घटल्याची स्थिती आहे. मंगळवारी (ता. 23) शहरातील 323 तर ग्रामीणमधील एक हजार 551 संशयितांची कोरोना टेस्ट झाली. त्यात शहरातील पाच तर ग्रामीणमधील 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामीणमधील खंडाळी (ता. माळशिरस) येथील एका तरुणीचा तर कन्हेरगाव (ता. माढा) येथील 72 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे अक्‍कलकोट, बार्शी, माढा, मंगळवेढा, मोहोळ व उत्तर सोलापूर या तालुक्‍यात मंगळवारी कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे, करमाळ्यातील सहा, माळशिरस तालुक्‍यात पाच, पंढरपूर तालुक्‍यात दोन तर सांगोला व दक्षिण सोलापूर तालुक्‍यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. शहरातील दोन, सहा, 16, 18, 19, 20, 24, 25 व 26 या प्रभागांमध्ये एकूण 11 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. शहरातील उर्वरित सर्व 17 प्रभाग कोरोनामुक्‍त आहेत.

हेही वाचा: सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात! पती-पत्नी जागीच ठार

शहरातील 1.64 लाख व्यक्‍ती लसीकरणापासून दूरच

शहरातील सहा लाख 40 हजार 503 व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणे अपेक्षित आहे. मात्र, फेब्रुवारीपासून अजूनपर्यंत शहरातील एक लाख 64 हजार 300 व्यक्‍तींनी प्रतिबंधित लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर दुसरीकडे पहिला डोस घेतलेल्या चार लाख 76 हजार 203 व्यक्‍तींपैकी दोन लाख 35 हजार 917 जणांनी दुसरा डोस घेतलेला नाही. तिसऱ्या लाटेपूर्वी प्रतिबंधित लसीकरण पूर्ण व्हावे, असे नियोजन अपेक्षित आहे. मात्र, लस न घेणाऱ्यांचा शोध घेतला जात नसल्याचे चित्र आहे.

loading image
go to top