esakal | सोलापुरात गांधीजींची कॉंग्रेस हायंच कुठं..? | Political News
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापुरात गांधीजींची कॉंग्रेस हायंच कुठं..?

आमच्या सोलापुरात मात्र गांधीजींच्या इचारांना मूठमाती देण्याचं काम दस्तुरखुद्द कॉंग्रेसच्या अध्यक्षांकडनंच व्हाय लागलंया...

सोलापुरात गांधीजींची कॉंग्रेस हायंच कुठं..?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संपूर्ण जगावर महात्मा गांधीजींच्या (Mahatma Gandhi) इचारांचा पगडा आहे. ज्यांनी कॉंग्रेसची (Congress) स्थापना केली, त्यांच्या इचारांवर कॉंग्रेस चालते, कॉंग्रेस त्येंचा वारसा सांगते... असं सांगितलं जातं. पन आमच्या सोलापुरात (Solapur) मात्र गांधीजींच्या इचारांना मूठमाती देण्याचं काम दस्तुरखुद्द कॉंग्रेसच्या अध्यक्षांकडनंच व्हाय लागलंया... अहिंसेचा विचार देणाऱ्या गांधीजींच्या कॉंग्रेसमदी हिंसेवर भर देण्यास प्रवृत्त केले जात हाय...

सद्या सोलापुरात महापालिका निवडणुकीचे वारं वाहू लागलंया... त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांकडून संपर्क अभियान सुरु हाय... प्रणितीताई (Praniti Shinde) पक्षाचं कार्याध्यक्ष झाल्यापास्न राज्यभर त्येंचे दौरे सुरु हायती... सोलापुरातला पाया मजबूत करण्यासाठी त्येंनी सगळीकडं संपर्क सुरु केला हाय... मध्यंतरी त्येंनी शहर उत्तरमदी सभा घेऊन माजी पालकमंत्री विजूमालकांना आव्हानच दिलं व्हतं...

हेही वाचा: भाजपच्या माजी मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात विरोधी एकही नाही नगरसेवक

मद्यंतरी सोलापुरातील डी ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या संपर्क कार्यालयाचं उद्‌घाटन ताईंच्या हस्ते करण्यात आलं... तवा जोरजोरात भाषणंबी झाली... ताईंच्या भाषणामदी सोलापूरचा पाणीप्रश्‍न, शहर इकास, स्मार्ट सिटीचा उल्लेख हुतोया... पण सोबतच्या नेत्यांच्या भाषणात मात्र ताई, शिंदे सायबास्नी खूष करण्यासाठी जोरदार रस्सीखेच लागतीया... सायबाची कृपा झाली तर काय बी हु शकतंया असं वाटतंया... अन्‌ ते खरंबी हाय...!

डी ब्लॉकच्या कार्यक्रमातबी तसंच झालं... अध्यक्ष वालेमालकबी घसरलं... सोलापूरच्या इकासासाठी शिंदे सायबानी काय केलं? असं जर कुणी इचारलं तर त्येंच्या थोबाडीत (चापट) एक मारा अन्‌ माझ्याकडं या मी बघून घेईन... असं एकदा नव्हं तर तीनयेळा बोललं... उपस्थित कॉंग्रेस कार्यकर्त्यांमदी चुळबूळ सुरु झाली... जुन्या कार्यकर्त्यांच्या मनाला येदना झाल्या... आपली कॉंग्रेस अहिंसेच्या तत्वावर चालतीया... हे थोबाडीत मारण्याचं नवा परयोग करायला अध्यक्ष कसं सांगू लागलेती... असं वाटू लागलं... तिथं ताईबी स्टेजवर हुत्या... त्येमुळे कोणाला तवा काय बोलता आलं नाय... तवा त्येंनी थेट मीडियाला फोन करुन आपल्या भावनांना वाट करून दिली... त्यामुळं स्थानिक चॅनलवाल्यांनी ही बातमी लईच जोरदार वाजवली...

हेही वाचा: राज्य सरकारविरोधात महापालिका सत्ताधाऱ्यांची राज्यपालांकडे तक्रार!

एकीकडं हे सगंळ सुरु असतानाच यामधलं "ग्यानबा'ची मेख कुणालाच काय ठाव नव्हती... नव्या कार्यकर्त्यांस्नी तर यातील काय बी ठाव नाय... त्येंनी अध्यक्षांच्या भाषणातील थोबाडीत मारण्याच्या प्रत्येकयेळच्या बोलण्याला परतिसादच दिला... जोरजोरात टाळ्या वाजवल्या... तवा वाले मालकास्नी आपलं भाषण लईच जोरात हाय... असं वाटल्यानं त्येंनी पुन्हा पुन्हा तेचा उच्चार केला... एकच काढून हाणा त्येला असंबी त्येंनी सांगत सायबांनी केलेल्या कामाची यादीच सादर केली... स्वतः सायब अन्‌ त्येंच्ये जुने कार्यकर्ते गांधीजींच्या इचाराचे पुरस्कर्ते पण त्येंच्या तत्वाला तिलांजली देत कॉंग्रेसच्या सुरु असलेल्या वाटचालीबद्दल मात्र जोरदार चर्चा सुरु झाली हाय... गांधीजींच्या तत्वाचा पुरस्कार करण्यापेक्षा तिरस्कार करणारे नेते फुढं येऊ लागल्यानं कॉंग्रेसचं मात्र काय खरं वाटू लागलंया...!

- थोरले आबासाहेब

loading image
go to top