esakal | पोलिसांना CSR फंडातून 4 लाखांची मदत; स्वप्निल पाटील यांच्या प्रयत्नाला यश
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांना CSR फंडातून 4 लाखांची मदत; स्वप्निल पाटील यांच्या प्रयत्नाला यश

पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या सीएसआर फंडातून चार लाख रुपयांचा धनादेश पोलिस कल्याण निधीसाठी उपलब्ध केला आहे.

पोलिसांना CSR फंडातून 4 लाखांची मदत; स्वप्निल पाटील यांच्या प्रयत्नाला यश

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : 'कोरोना योध्दा' पोलिसांसाठी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने (solapur rural police force) कोव्हिड केअर सेंटरची (covid care center) उभारणी केली असून, यासाठी सामाजिक बांधिलकीतून सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा पुण्याचे आयकर विभागाचे जॉईंट कमिशनर स्वप्निल पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या सीएसआर फंडातून चार लाख रुपयांचा धनादेश पोलिस कल्याण निधीसाठी उपलब्ध केला आहे. (The covid care center was set up by the solapur rural police force)

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस रात्रंदिवस खडा पहारा देऊन कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. हे करीत असताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागण होऊन त्यात मृत्यूदेखील झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलिसांसाठी कोव्हिड केअर सेंटर उभारले आहेत.

जनतेच्या खबरदारीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या या पोलिसांसाठी सामाजिक बांधिलकीतून 'फूल नाय फुलाची पाकळी म्हणून' उपळाई बुद्रूक (ता.माढा) येथील शरद पाटील यांनी आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेऊन, स्वप्नील पाटील यांच्या प्रयत्नातून पुण्यातील नामांकित कंपनीच्या सीएसआर फंडातून चार लाखांचा धनादेश उपलब्ध केला. तो नुकताच माढ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा यांच्याकडे शरद पाटील यांनी सुपूर्द केला आहे. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री. तागडे, श्री. मांजरे उपस्थित होते.

हेही वाचा: "पहले कोरोना से निपट लेंगे, फिर ईद की खुशीयॉं मनायेंगे !'

जनतेच्या खबरदारीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या या पोलिसांसाठी सामाजिक बांधिलकीतून 'फूल नाय फुलाची पाकळी म्हणून' उपळाई बुद्रूक (ता.माढा) येथील शरद पाटील यांनी आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेऊन, स्वप्नील पाटील यांच्या प्रयत्नातून पुण्यातील नामांकित कंपनीच्या सीएसआर फंडातून चार लाखांचा धनादेश उपलब्ध केला. तो नुकताच माढ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा यांच्याकडे शरद पाटील यांनी सुपूर्द केला आहे. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री. तागडे, श्री. मांजरे उपस्थित होते.

ग्रामीण पोलिस दलाच्या कल्याण निधीसाठी आव्हान केले असता, सोलापूरचे भूमिपुत्र असलेल्या स्वप्निल पाटील यांनी तातडीने सीएसआर फंडातून लाखो रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. ही आमच्यासाठी मोलाची मदत असून, त्यासाठी त्यांचे आभार. हा निधी पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटर खर्च करण्यात येईल.

- अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

(The covid care center was set up by the solapur rural police force)