vitthal sahkari sakhar kharkhana
vitthal sahkari sakhar kharkhanasakal media

पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याच्या जप्तीचा फैसला आज पुण्यात!

पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याच्या जप्तीचा फैसला आज पुण्यात!
Summary

जप्तीची कारवाई टाळण्यासाठी कारखान्याचे काही संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (Vitthal Sugar Factory) जप्तीचा फैसला आज मंगळवारी (ता. 14) पुण्यात (Pune) होणार आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी कारखान्याचे काही संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, राज्य सहकारी बॅंकेने (State Co-operative Bank) काही रक्कम भरण्याच्या अटीवर कारवाईला स्थगिती देण्याची तयारी दर्शवली आहे. त्या संदर्भात आज (मंगळवारी) पुणे येथे राज्य सहकारी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी आणि काही संचालकांची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. (The decision to seize the Vitthal sugar factory in Pandharpur will be taken in Pune today)

vitthal sahkari sakhar kharkhana
कोरोना मृतांच्या वारसांचे अर्ज 'रिजेक्‍ट'! 'ही' आहेत कारणे

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बॅंकेचे सुमारे 400 कोटींचे थकीत कर्ज आहे. कर्ज वसुलीसाठी राज्य सहकारी बॅंकेने कारखान्याची मालमत्ता जप्तीची अंतिम नोटीस दिली आहे. त्यानुसार आज प्रत्यक्ष जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यापूर्वीच कारखान्याच्या काही संचालकांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आल्याची माहिती आहे.

vitthal sahkari sakhar kharkhana
देशमुख म्हणाले कारखाना हलवा; काडादी म्हणाले बंगला का बांधला?

जप्तीच्या संदर्भात आज पुणे येथील राज्य सहकारी बॅंकेच्या कार्यालयात बैठक होणार आहे. कारखान्याकडे हप्ता व व्याजाची 6 कोटींची रक्कम थकीत आहे. ती रक्कम भरावी, अशी बॅंकेची प्रथम मागणी आहे. ती रक्कमही कारखान्याने अद्याप भरली नाही. त्यामुळे बॅंकेने कारखान्यावर जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. यापैकी काही रक्कम भरण्याची तयारी कारखान्यने दर्शवली असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडेच तालुक्‍यातील सभासदांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com