कोरोनामुळे गेलेल्या मित्राच्या कुटुंबाला वर्गमित्रांनी केली 72 हजारांची मदत

कोरोनामुळे गेलेल्या मित्राच्या कुटुंबाला वर्गमित्रांनी केली 72 हजारांची मदत
esakal
Summary

संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. मैत्रीच्या या आगळ्या वेगळया रूपाची प्रचिती अरणगावच्या ढवळे कुटुंबाला आली आहे.

मळेगाव (सोलापूर) : कोरोनाच्या (Corona) संसर्गामुळे आपल्याला सोडून गेलेल्या वर्गमित्राच्या कुटुंबाला मदत (Help) व्हावी, यासाठी कर्मवीर मळेगाव (ता. बार्शी) येथील ना. मा. गडसिंग (गुरुजी) मित्र विद्यालयातील सन 1998 ची इयत्ता दहावीची बॅच पुढे आली आहे. संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. मैत्रीच्या या आगळ्या वेगळया रूपाची प्रचिती अरणगावच्या ढवळे कुटुंबाला आली आहे. (the demise of mahadev dhawale, his classmates have helped his family with rs 72 thousand)

कोरोनामुळे गेलेल्या मित्राच्या कुटुंबाला वर्गमित्रांनी केली 72 हजारांची मदत
आदर्श गाव ! सलग 45 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक नाही; मळेगाव ठरतंय राज्यातील रोल मॉडेल 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महादेव विनायक ढवळे (वय 39) (रा. अरणगाव, ता. बार्शी) यांचे निधन झाले. महादेव यांच्या अचानक जाण्याने ढवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्‍चात नऊ वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, पत्नी, आई व वडील असा त्यांचा परिवार आहे. आपल्या वर्गमित्राचे निधन झाल्याची बातमी व्हॉट्‌सऍप ग्रुपवर समजताच केवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहून थांबायचे नाही तर महादेवाच्या कुटुंबाला आर्थिक आधार द्यायचा, असे 1998 च्या इयत्ता दहावीच्या वर्गमित्रांनी ठरविले. त्यानंतर काही तासातच 72 हजारांची मदत गोळा झाली व ती अरणगाव येथे जाऊन ढवळे कुटुंबाला सुपूर्द केली.

कोरोनामुळे गेलेल्या मित्राच्या कुटुंबाला वर्गमित्रांनी केली 72 हजारांची मदत
मळेगाव परिसरात परतीच्या पावसाचे धुमशान; शेतकऱ्यांच्या अश्रूंचा फुटला बांध

महादेव ढवळे यांनी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण मित्र विद्यालय येथे पूर्ण केले आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यालयात संगणक ऑपरेटर म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी बार्शी सत्र न्यायालयाशेजारी समर्थ ग्राफिक्‍स व टाईपरायटींग सेंटर सुरू केले. मात्र नियतीला तेही मान्य झाले नाही. कोरोनाच्या संसर्गामुळे महादेव ढवळे यांचे निधन झाले. अत्यंत कष्टाळू, सालस, विनम्र अशी त्यांनी समाजात ओळख निर्माण केली होती. महादेवच्या पश्‍चात त्यांची पत्नी, मुले, आई-वडील यांच्या पाठीशी भविष्यात देखील उभे राहण्याचे वर्गमित्रांनी ठरविले आहे. कोरोनाच्या संकटात माणसं माणसापासून दुरावत असताना दहावीच्या वर्गमित्रांनी मयत मित्राच्या कुटुंबाला आर्थिक आधार देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com