भीमा नदीत बुडालेल्या मामी-भाच्याचे मृतदेह पाहून फोडला कुटुंबीयांनी हंबरडा

भीमा नदीत बुडालेल्या मामी-भाच्याला पाहून कुटुंबीय दु:खात बुडाले
Pandharpur
PandharpurCanva
Updated on
Summary

जय जाधव नदीपात्रात उतरला. तो बुडू लागल्याचे पाहून पायल लोंढे आणि अन्य एक महिला अशा दोघी नदीपात्रात पुढे गेल्या. त्या बुडू लागल्याचे पाहून जवळच असलेल्या सुग्रीव लोंढे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील चिंचोली भोसे येथील भीमा नदी (Bhima River) पात्रात काल शुक्रवारी (ता. 28) बुडालेल्या मामी आणि भाच्याचे मृतदेह आज (शनिवारी) दुपारी शोध घेत असताना नदी पात्रात सापडले. मामा सुग्रीव लोंढे यांच्याकडे तीनच दिवसांपूर्वी राहण्यास आलेल्या कासेगाव येथील जय दत्ता जाधव (वय 12) आणि त्याची मामी पायल सुग्रीव लोंढे (वय 18 ) यांचे मतदेह नदी पात्रातून बाहेर काढल्यावर कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. (The family was devastated to see their aunt and nephew drowning in the river Bhima)

Pandharpur
शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर ! ग्रामीणमध्ये टेस्टिंग कमी !

तालुक्‍यातील कासेगाव येथील जय दत्ता जाधव हा त्याचा मामा सुग्रीव लोंढे यांच्याकडे तीनच दिवसांपूर्वी राहण्यासाठी चिंचोली भोसे येथे आला होता. गावातील काही महिलांसह काल (ता. 28) दुपारी पायल सुग्रीव लोंढे कपडे धुण्यासाठी नदीकडे गेल्या होत्या. त्या वेळी जय जाधव आणि सुग्रीव जाधव हे देखील सोबत गेले होते. पायल लोंढे या धुणे धूत असताना जय जाधव नदीपात्रात उतरला. तो बुडू लागल्याचे पाहून पायल लोंढे आणि अन्य एक महिला अशा दोघी नदीपात्रात पुढे गेल्या. त्या बुडू लागल्याचे पाहून जवळच असलेल्या सुग्रीव लोंढे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. एका महिलेला वाचवण्यात त्यांना यश आले, परंतु पायल आणि जय हे खोल पाण्यात बुडाले. काल दुपारपासून पोलिस आणि गावकरी त्या दोघांचा नदीपात्रात शोध घेत होते.

Pandharpur
"वाझे, देशमुख, सिंग, परब यांच्यानंतर आव्हाड यांचा नंबर !

दरम्यान, आज शनिवारी दुपारी होडीतून शोध सुरू असताना चिंचोली भोसे येथे नदीपात्रात काही अंतरावर जय जाधव आणि पायल लोंढे या दोघांचेही मतदेह सापडले. मामाकडे तीनच दिवसांपूर्वी राहण्यासाठी आलेला भाचा आणि मामी या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक किरण अवचर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com