बापमाणूस! मुलाच्या क्रिकेट मैदानासाठी दिली पाच एकरची द्राक्षबाग

मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी वडिलांनी दिली पाच एकर द्राक्षबाग
Pandharpur
PandharpurCanva
Summary

मैदानात आठ खेळपट्ट्या बनविण्यात आल्या असून त्यात पाच मुख्य व तीन प्रॅक्‍टिससाठी आहेत. सुमारे पाच एकर जागेमध्ये क्रीडांगणाचे काम सुरू असून, 200 प्रेक्षक बसून शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) : सहसा पालक आपल्या मुलांचे सर्वच हट्ट पुरवतात. मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पालक दिवसरात्र मेहनत करतात. पंढरपूरच्या (Pandharpur) अनवली (Anavali) गावामध्ये बांधकाम ठेकेदार तथा शेतकरी राजेंद्र ऊर्फ बाळासाहेब सूर्यवंशी (Construction contractor and farmer Rajendra Suryavanshi) यांनी त्यांच्या मुलाच्या क्रिकेट (Cricket) प्रेमासाठी त्यांच्या पाच एकर शेतीतील द्राक्षबाग तोडून त्या जागेमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकनाची क्रिकेटची खेळपट्टी (International standard cricket pitch) साकारत आहेत. (The father gave five acres of vineyards for his son's love of cricket)

Pandharpur
मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेले तरुण सरपंच ऋतुराज देशमुख आहेत तरी कोण?

अनवलीच्या राजेंद्र सूर्यवंशी यांचा मुलगा अभियश याला क्रिकेटची आवड आहे. त्याने कोल्हापूरचे क्रिकेट कोच डॉ. अब्राम पटेल यांच्याकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. तो गेल्या वर्षी नंदूरबार जिल्ह्याकडून 14 वर्षांखालील गटातील स्पर्धा खेळला आहे. तसेच पुण्यात त्याच्या नेतृत्वाखाली टीमने दोन स्पर्धा देखील जिंकल्या आहेत. अभियश लॉकडाउनमुळे गावी परतला आहे. गावी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी चांगले मैदान नाही. त्याची ही अडचण राजेंद्र सूर्यवंशी यांनी ओळखली. त्याच्या सरावात कुठेही खंड पडू नये म्हणून त्यांनी त्यांच्या शेतात राष्ट्रीय स्तरावरील मैदान उभारण्याचे ठरवले आहे.

Pandharpur
यंदाही शाळा राहणार बंदच ! दिवाळीनंतर आठवी ते बारावीचा निर्णय

या ठिकाणी आठ पीच (खेळपट्ट्या) बनविण्यात आल्या असून त्यात पाच मुख्य व तीन प्रॅक्‍टिससाठी पीच आहेत. सुमारे पाच एकर जागेमध्ये क्रीडांगणाचे काम सुरू असून, 200 प्रेक्षक बसून शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे 80 टक्के काम पूर्ण होत आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआयचे) ज्येष्ठ पीच क्‍युरेटर रमेश महामूनकर (BCCI Senior Pitch Curator Ramesh Mahamoonkar) यांनी संपूर्ण क्रीडांगणाच्या जागेची पाहणी करून खेळपट्टीसंबंधित सूचना केल्या. पाहणीनंतर आमदार क्रिकेट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील (MLA Ranjit Singh Mohite- Patil, District President of Cricket Association) आणि श्री. महामूनकर यांनी या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रिकेट सामने आयोजित करण्याबाबत चर्चा केली. बीसीसीआयकडे याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

या मैदानाचे काम सुरू असताना अभियशच्या सरावात खंड पडणार नाही, याची काळजी राजेंद्र सूर्यवंशी घेतली आहे. तो बॉलिंग मशिनच्या साह्याने सराव करत आहे. त्यासाठी शेतामध्येच लहान पीच बनवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com