पालकमंत्री भरणेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही; सोलापूर शिवसेनेचा इशारा

dattatray bharne
dattatray bharne

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत एक एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे पालकमंत्री अडचणीत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या वक्तव्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्याचा सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजी शिंदे यांनीही निषेध व्यक्त केला आहे.

dattatray bharne
पानशेत धरणात बुडाली कार; महिलेचा मृत्यू पती, मुलगा बचावले

शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत, त्यांच्या बाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढलेले उद्गार हे निषेधार्ह असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही, असा इशारा ही पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे. आज देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्शवभूमीवर सोलापुरात प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांची जीभ घसरली. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यानंतर जिल्हा शिवसेनेत भरणे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून शिवसेना जिल्हा प्रमख संभाजी शिंदे हे आक्रमक झाले आहेत. पालक मंत्र्यांनी बोलताना भान राखावे. त्यांना हा बालीशपणा शोभणारा नाही. यापुढे पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा ही शिंदे यांनी दिला आहे.‌

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com