esakal | अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन, गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द!
sakal

बोलून बातमी शोधा

अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन, गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द!

अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन, गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द!

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

वर्धापनदिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सव काळातील कार्यक्रम रद्द करून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : देश-विदेशात नावलौकिक मिळवलेल्या व अन्नदान सेवेत अग्रगण्य असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) (Shri Swami Samarth Annachhatra Mandal) या न्यासाचा यंदाचा 33वा वर्धापनदिन आणि श्री गुरुपौर्णिमा (Gurupournima) उत्सवानिमित्त संपन्न होणारे धर्मसंकीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम कोरोना (Covid-19) राष्ट्रीय आपत्तीमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती न्यासाचे संस्थापक- अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले (Janmejayraje Bhosle) यांनी दिली आहे. कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे गतवर्षी न्यासाचा वर्धापनदिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव, धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने जनजीवन ठप्प आहे. म्हणून वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सव काळातील कार्यक्रम पूर्णपणे रद्द करून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (The Gurupournima program in Akkalkot was canceled due to the Corona disaster-ssd73)

हेही वाचा: समाधान, तू नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस - उद्धव ठाकरे

गुरुपौर्णिमेला "श्रीं'ची नित्योपचार पूजा होऊन महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. न्यासाचे स्वामी भक्तांसाठी अन्नदानाचे स्वामीकार्य कोरोना विषाणूच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून थांबले आहे. या महामारीमुळे अन्नदान सेवा तात्पुरती स्थगित आहे. कोरोनाला हरविण्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय साधनसामग्री, स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामग्री आदींची मदत हे न्यास सातत्याने करीत आहे. नागरिकांना मास्क, सॅनिटाझरचे वाटप करण्यात येत आहे. अक्कलकोट येथील दोन कोविड सेंटर्स येथील रुग्णांना दररोज अल्पोपाहाराचे वाटप केले जात आहे.

हेही वाचा: "ठाकरे कुटुंबीयांची आपुलकी भावली..!'

लॉकडाउन (Lockdown) कालावधीत शहरामध्ये गरीब, निराधार व गरजूंना दैनंदिन अन्नदानाचे कार्य न्यासाने केले आहे. तालुक्‍यात ज्यांना जेवण पोच करता येत नव्हते, अशा गरजूंना अन्नधान्य शिधा किटचे तर पुण्यातील व सोलापुरातील गरजू व कलाकारांना अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. कोरोना विषाणू संदर्भात न्यासाच्या वतीने गेल्या वर्षी यात्री निवासमध्ये कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू होते. यावर्षी सुद्धा मार्चपासून यात्री निवास येथे कोविड केअर सेंटर चालू आहे. न्यासाच्या वतीने सेंटरमधील रुग्णांना चहा, नाश्‍ता व जेवण पुरविण्यात आले. शहर व ग्रामीण भागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येत आहे. वैद्यकीय मदत व सेवा पुरविण्यात येत आहे. अन्नदान सेवा, तात्पुरती स्थगित असून महाप्रसाद गृह, यात्री भुवन, यात्री निवास, निवासी व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी सांगितले.

loading image