esakal | 1972 चा इंदिरा गांधी पाझर तलाव कोरडा! दुरुस्तीसाठी फोडला बांधारा
sakal

बोलून बातमी शोधा

Indira Gandhi Pajar lake

पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करण्यासाठी सन 2017 मध्ये मुळ बांधारा फोडल्याने लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.

सोलापूर: 1972 चा इंदिरा गांधी पाझर तलाव कोरडाच

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

वळसंग (सोलापूर): 1972 च्या दुष्काळात मजुरांना सुकडी देऊन आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे पाझर तलाव निर्माण करण्यात आला होता. राज्यात सर्वत्र तलाव ओढे नाले भरून वाहत असताना येथील इंदिरा गांधी पाझर तलाव मात्र अजूनही कोरडाच आहे. पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करण्यासाठी सन 2017 मध्ये मुळ बांधारा फोडल्याने लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.

1972 च्या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या तलावाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर हा तलाव आचेगावसाठी वरदान ठरला होता. गावचा पाणीपुरवठा व तलावाखालील जवळजवळ शंभर हेक्टर जमीन ओलिताखाली आली होती. मध्यंतरीच्या दोन दुष्काळांचा अपवाद वगळता गावाचा संपूर्ण पाणीपुरवठा याच तलावाखाली असलेल्या विहिरीवर अवलंबून होता. सन 2012-13 नंतर या तलावाचे रूपांतर साठवण तलावात करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

हेही वाचा: वळसंग : इंदिरा गांधी पाझर तलाव कोरडा , दुरुस्तीसाठी फोडला बांधारा

या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकल्प रखडल्याचे दिसून येत आहे. या साठवण तलावामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन जात आहे, त्या शेतकऱ्यांनी प्रकल्पामुळे जाणारी जमीन शासकीय मोजमाप करून हद्दीच्या खुणा कायम कराव्यात अशी मागणी केली आहे. तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून त्यावेळी यावर कारवाई करण्यात आलेली नाही, यामागचे गौडबंगाल काय असा सवाल येथील शेतकरी कल्लप्पा सुलेगाव यांनी केला. मृद व जलसंधारणाचे उपअभियंता धनंजय साहुत्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तोंडी अथवा लेखी कोणत्याही प्रकारची माहिती स्थानिक बातमीदारास दिलेली नाही. माहितीचा अधिकारामध्ये ही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, त्यामुळे यात काहीतरी काळेबेरे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: आता सर्वांनाच खायला मिळणार वळसंग पोलिस ठाण्याची शुद्ध "हवा' ! 

सकाळ वृत्तपत्र समूहाने पाठपुरावा केल्याने वळसंग येथील हुतात्मा तलाव, सिद्धेश्वर तलाव, हालचिंचोळी येथील पाझर तलाव इत्यादींचे प्रश्न मार्गी लागले आहेत. आचेगाव येथील तलावाबाबत सकाळ माध्यम समूहाने लक्ष घातल्यास निश्चितच काम मार्गी लागेल .

- जयशंकर पाटील, माजी सरपंच, आचेगाव

शेतकरी, लोकप्रतिनिधी, ठेकेदार, शासनाचे प्रशासकीय अधिकारी यांनी समन्वयाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा. हा प्रश्न सुटला नाही तर एक पिढी बरबाद होण्याची शक्यता आहे.

- दयानंद खोबण, ग्रामस्थ आचेगाव

loading image
go to top