येळकोट येळकोट जय मल्हार! बाळे येथील खंडोबा यात्रेस प्रारंभ

येळकोट येळकोट जय मल्हार! बाळे येथील खंडोबा यात्रेस प्रारंभ
बाळे येथील खंडोबा यात्रेस प्रारंभ
बाळे येथील खंडोबा यात्रेस प्रारंभesakal
Summary

बाळे येथील श्री खंडोबा यात्रेस गुरुवारी (ता. 9) मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.

सोलापूर : बाळे (Bale, Solapur) येथील श्री खंडोबा यात्रेस (Khandoba Yatra) गुरुवारी (ता. 9) मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. पहाटे पाच वाजता काकडा आरती व 8.30 वाजता अभिषेक परंपरेनुसार भक्तिभावात पार पडला. 2 जानेवारीपर्यंत प्रत्येक रविवारी चालणाऱ्या यात्रेची संपूर्ण तयारी मंदिर समितीकडून करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष विनय ढेपे (Vinay Dhepe) यांनी दिली. (The Khandoba Yatra at Bale has started from Thursday)

बाळे येथील खंडोबा यात्रेस प्रारंभ
बोंबा मारत केली एसटी कर्मचाऱ्यांनी निलंबन-बदली नोटिसांची होळी

कोरोनाच्या (Covid-19+ पार्श्‍वभूमीवर श्रीक्षेत्र बाळे येथील मंदिरात खंडोबा यात्रा साध्या पद्धतीने व निर्बंधांचे पालन करीत साजरा करण्यात येत आहे. त्याकरिता मंदिराची रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता काकडा आरती झाली. सकाळी 'श्रीं'ना अभिषेक करण्यात आला. भक्तांना दर्शनासाठी सकाळपासून दिवसभर मंदिर खुले करण्यात आले.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमिक्रॉन'ची (Omicron) परिस्थिती लक्षात घेऊन, रविवारपासून दोन लस (Covid Vaccine) घेतलेल्या आणि ज्या भाविकांनी ऑनलाइन दर्शन पास घेतले आहेत, त्यांनाच दर्शनासाठी मंदिरामध्ये सोडण्यात येणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले. 2 जानेवारीपर्यंत प्रत्येक रविवारी चालणाऱ्या यात्रेसाठी भक्तांची सोय व्हावी यासाठी ऑनलाइन पासची सुविधादेखील मंदिर समितीकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी साडेआठ वाजता श्री खंडोबा मूर्तीवर मानकऱ्यांकडून महाअभिषेक करण्यात आला. फळांचा नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. मास्कशिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. परंतु, सोशल डिस्टन्सिंगचा विसर अनेकांना पडला होता. तळी उचलून खंडोबाला भरीत-रोडगा आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून यात्रेतील उत्सवाला भक्तिभावात सुरवात झाली.

घराघरात घटस्थापना

खंडोबा यात्रेनिमित्त मागील रविवारी अनेकांच्या घरी परंपरेनुसार घटस्थापना करण्यात आली होती. मार्गशीर्ष षष्ठीला घट उठले आहेत. चंपाषष्ठीला भंडाऱ्याची उधळण करीत तळी उचलण्यात आली. गूळ- खोबऱ्याचा प्रसाद देण्यात आला. श्री खंडोबा देवाला वांग्याचे भरीत, बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य अर्पण करून, वांगी, कांदे खाण्यास सुरुवात होणार असल्याचे या वेळी देवस्थानकडून सांगण्यात आले.

बाळे येथील खंडोबा यात्रेस प्रारंभ
'तू बडा की मैं बडा!' सत्ता अंगी भिनली, बेशिस्तीने कळस गाठला

हे असणार नियम

  • स्थानिक दुकानांव्यतिरिक्त नवीन दुकाने लावण्यास बंदी

  • जागरण गोंधळ, वाघ्या- मुरळीला मंदिरात कार्यक्रम घेता येणार नाहीत

  • पहिल्या दिवशी आरतीला गाभाऱ्यात मर्यादित भक्तांनाच प्रवेश

  • दहा वर्षांखालील मुले आणि 75 वर्षांवरील वृद्धांना प्रवेश नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com