
पावसाळ्याच्या आरंभीच स्थानिक धरण परिसरात झालेल्या चांगल्या पावसाच्या जोरावर धरणाने हा अर्धशतक पाणी साठ्याचा पल्ला गाठला आहे.
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) शहरासह मैंदर्गी व दुधनी नगरपरिषद त्याचप्रमाणे या खाली असणाऱ्या सात बंधाऱ्यांच्या परिसरात असणाऱ्या नागरिकांना व शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कुरनूर धरणाने (Kurnoor Dam) अर्धशतकी उंबरठ्यावर पाणी साठा वाढेपर्यंत मजल मारली आहे. पावसाळ्याच्या आरंभीच स्थानिक धरण परिसरात झालेल्या चांगल्या पावसाच्या जोरावर धरणाने हा अर्धशतक पाणी साठ्याचा पल्ला गाठला आहे. (The Kurnoor dam in Akkalkot taluka has 49 percent water storage-ssd73)
अक्कलकोट तालुक्यातील (Akkalkot Taluka) गावांत खरीप हंगामातील पाऊस जेमतेम तर रब्बी हंगामातील परतीचा पाऊस जोरदार बरसतो आणि पाणी साठा वाढतो, असे चित्र असते. पण या वेळी लवकरच धरणात पाणी साठा वाढताना दिसत आहे. शुक्रवारी (ता. 23) कुरनूर धरणातील पाणी साठा 49 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे उर्वरित पावसाळा अजून खूप जास्त असल्याने दोन- चार मोठे पाऊस झाल्यास धरण लवकरच 100 टक्के भरण्यास मदत होणार आहे. आणि यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अक्कलकोट शहर, दुधनी, मैंदर्गी या शहरांच्या पाणीपुरवठ्यासह शेतकरी व बोरी नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आज शुक्रवारी सकाळी कुरनूर धरण एकूण क्षमता असलेल्या 822 दशलक्ष घनफुट पाण्यापैकी 400 दशलक्ष घनफूट इतके म्हणजेच 49 टक्के पाणी साठले आहे. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरातील गावे आणि त्याखील पूर्व भागातील बोरी नदीकाठच्या गावांची तहान भागण्यासाठी हे धरण 100 टक्के भरणे महत्त्वाचे आहे. तुळजापूर तालुक्यातील बोरी धरण अद्याप न भरल्याने त्यातून खाली पाणी सोडले गेले नाही. त्यातच कुरनूर धरण परिसरातील पावसाने धरण पन्नास टक्केपर्यंत पोचले आहे.
आजपर्यंत झालेला नऊ मंडळातील पाऊस सरासरी 112.66 मिलिमीटर
अक्कलकोट तालुक्यात 22 जुलै 2021 पर्यंत नोंदलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. या वेळी प्रारंभी सर्वांत जास्त पाऊस अक्कलकोट मंडळात (203) मिलिमीटर तर सर्वात कमी मैंदर्गी मंडळात (53) मिलिमीटर एवढा झाला असून, तालुक्यातील एकूण सरासरी आतापर्यंत सरासरी 112.66 मिलिमीटर एवढी झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील नऊ मंडळात आतापर्यंत झालेल्या पावसाची बाहेरची आकडेवारी गुरुवारपर्यंतची तर कंसातील एकूण पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे : अक्कलकोट 10 (203), चपळगाव 08 (117), वागदरी 22 (167), किणी 10 (96), मैंदर्गी 06 (53), दुधनी 04 (116), जेऊर 07 (99), करजगी 03 (95), तडवळ 06 (68).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.