कोरे चेक घेऊन वकिलाने केली महिलेची बारा लाखांची फसवणूक!

वकिलाने केली कोरे चेक घेऊन महिलेची बारा लाखांची फसवणूक! वळसंग येथील घटना
कोरे चेक घेऊन वकिलाने केली महिलेची बारा लाखांची फसवणूक!
कोरे चेक घेऊन वकिलाने केली महिलेची बारा लाखांची फसवणूक!Sakal
Updated on: 
Summary

महिलेच्या भोळेपणा व अज्ञानपणाचा फायदा घेऊन लबाडीने वेळोवेळी बारा लाख रुपयांची रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आली.

वळसंग (सोलापूर) : ज्योती कुश सोनकांबळे (वय 27, रा. वळसंग, तालुका दक्षिण सोलापूर) यांना सोलापूर शहरातील विवेक रामचंद्र शाक्‍य, तानाजी धनाजी शिंदे यांनी समाजकल्याण विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देतो असे म्हणून कोऱ्या चेकवर सही घेऊन बारा लाखांना फसवले (Fraud) आहे. 488/2021 भादंवि कलम 420, 468, 406, 384, 504, 506, 34 प्रमाणे वळसंग पोलिसांत याबाबत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

कोरे चेक घेऊन वकिलाने केली महिलेची बारा लाखांची फसवणूक!
'टक्केवारी' प्रकरण : झेडपी अध्यक्षांच्या पीएला सीईओंची नोटीस

याबाबत वळसंग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की ऍट्रॉसिटी प्रकरणात मनोधैर्य वाढीसाठी समाजकल्याण खात्याकडून पीडितेला आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी ज्योती सोनकांबळे यांनी समाजकल्याण खात्यात जाऊन चौकशी केली असता तेथे सांगण्यात आले की, आमच्याकडे तुमचे कोणतेही कोरे सही केलेले चेक घेतले जात नाहीत. तुम्ही दिलेल्या खात्यावर आम्ही रक्कम जमा करीत असतो व सदरची रक्कम तुम्हाला मनोधैर्य योजनेखाली दिली जाते. त्यामुळे ती रक्कम तुमच्या वकिलांनी घेऊन तुमची फसवणूक केली आहे, असे सांगण्यात आले.

त्या वेळी फिर्यादीचे वकील शाक्‍य व तानाजी शिंदे यांना कोणतेही वकीलपत्र दिलेले नसताना त्यांनी फिर्यादीच्या भोळेपणाचा व अज्ञानपणाचा फायदा घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीने वेळोवेळी रोख 3,25,000 रुपये व चेकने 8,76,000 रुपये अशी एकूण 12,01,000 रुपयांची रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक केली. तसेच ज्योती सोनकांबळे यांच्याकडून घेतलेले कोरे चेक समाजकल्याण कार्यालयास द्यावयाचे आहे, असे खोटे सांगून स्वत:च्या बॅंक अकाउंटवर वटवले आहे. तसेच सहा लाख रुपयांची खंडणी, शिवीगाळ व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी असे विविध आरोप वकील व त्यांच्या साथीदाराविरुद्ध करण्यात आले आहेत.

कोरे चेक घेऊन वकिलाने केली महिलेची बारा लाखांची फसवणूक!
हिवाळ्यात आरोग्याची काळजी! पौष्टिक आहारासह सांध्यांना हवी मालिश

याबाबत वकील शाक्‍य याला पोलिसांनी अटक केली असून त्याचा साथीदार तानाजी शिंदे फरार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस फौजदार धनसिंग राठोड हे करीत आहेत.

बातमीदार : दिनकर नारायणकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Drought Relief 2026 Farmers May Get Compensation Before Diwali Check Required Documents and Application Details
Shardiya Navratri Begins in Maharashtra with Ghatasthapana at Tuljapur Mahur Kolhapur and Saptashrungi Temple
Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
Marathi News Esakal
www.esakal.com