सोलापूरच्या आजी-माजी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाचा लागणार कस

सोलापूरच्या आजी-माजी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाचा लागणार कस
Guardian Ministers
Guardian MinistersCanva
Updated on

राष्ट्रवादीच्या रणनीतीवर कॉंग्रेस व शिवसेना कशी व्यक्त होणार? ते राष्ट्रवादीला मनापासून साथ देणार, की आगामी काळात भाजपला अदृश्‍य हात मदत करणार? याची उत्सुकता लागली आहे.

सोलापूर : एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) ताब्यात असलेली सोलापूर विधान परिषदेची जागा, जिल्हा परिषद व कॉंग्रेस (Congres) - राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली सोलापूर महापालिका भाजपने मागील पाच-सहा वर्षात हिसकावून घेतली. या तीन ठिकाणच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय (Dattatraya Bharne) भरणे आणि माजी पालकमंत्री भाजप आमदार विजयकुमार देशमुख MLA Vijaykumar Deshmukh)) यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. (The leadership of the Guardian Ministers of Solapur is facing a test in the future)

Guardian Ministers
सांगोला उपसा सिंचन सर्व्हेसाठी निविदा! 12 गावांना मिळणार उजनीतून पाणी

सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व अप्रत्यक्षरीत्या माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख व विधान परिषद सदस्य प्रशांत देशमुख (Prashant Deshmukh) यांच्या हातात आले आहे. भाजपची रणनीती असो की महत्त्वाचे निर्णय, हे आमदार देशमुख व आमदार परिचारक यांच्या मर्जीनेच घेतले जातात. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील (MLA Ranjitsingh Mohite-Patil) यांच्या माध्यमातून भाजपला बळ मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये असलेला समन्वय ही भाजपची सध्याची मोठी ताकद आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील संघर्षही आता किमान चव्हाट्यावर येताना दिसत नाही. भाजपच्या नेत्यांमध्ये असलेला एकसंधपणाही भाजपची आजची सर्वांत मोठी बाजू आहे.

Guardian Ministers
राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलाय - गोपीचंद पडळकर

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना यामध्ये मात्र समन्वयाचा मोठा अभाव दिसत आहे. मित्र पक्षांमध्ये ज्या पद्धतीने समन्वयाचा अभाव आहे तसाच समन्वयाचा मोठा अभाव हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही दिसत आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकत्रित घेऊन विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडीच्या ताब्यात मिळविण्याचे मोठे आव्हान सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर आहे. सोलापूरपेक्षा मला इंदापूर महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्री भरणे वारंवार सांगत आहेत. अशा स्थितीत सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत असलेले दोन गट, कॉंग्रेस व शिवसेनेला राष्ट्रवादीबद्दल नसलेला विश्वास अशा विचित्र स्थितीत पालकमंत्री भरणे यांना आपले नेतृत्व सिद्ध करावे लागणार आहे. विधान परिषद निवडणूक असो की महापालिका निवडणूक, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मित्रपक्षातील नेत्यांनाच राष्ट्रवादीत घेण्याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादीच्या या रणनीतीवर कॉंग्रेस आणि शिवसेना कशी व्यक्त होणार? ते राष्ट्रवादीला मनापासून साथ देणार, की आगामी काळात भाजपला अदृश्‍य हात मदत करणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

ग्रामीण नेत्यांची पालकमंत्र्यांकडे पाठ

पालकमंत्री दत्तात्रय भरणे ज्या वेळी सोलापूरच्या दौऱ्यावर येतात, त्या वेळी त्यांच्यासोबत सोलापूर शहर राष्ट्रवादीतील नेत्यांचा अधिक गराडा असतो. ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यात फारसा समन्वय असल्याचे दिसत नाही. या नेत्यांना सोबत घेऊन हातातून गेलेल्या जागा पुन्हा मिळविण्याची किमया पालकमंत्री भरणे यांना साध्य करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com