अवैध वाळू साठ्यावर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

अवैध वाळू साठ्यावर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Updated on
Summary

ही कारवाई सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली.

कुर्डू (सोलापूर) : लऊळ-कुर्डू ता. माढा रोडवरील कुर्डू हद्दीतील माळरानावर पांढऱ्या टिपर सह 36 ब्रास अवैध वाळुसह एकूण सतरा लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल 22 जून मंगळवार रोजी सायंकाळी 5.40 च्या सुमारास जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली. (the local crime branch of solapur has taken action against illegal sand stock in kurdu border)

अवैध वाळू साठ्यावर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
अकरा हजार डोसचे दीड तासात बुकिंग! 94 केंद्रांवरून आज लसीकरण

या घटनेची फिर्याद पो.कॉ.धनराज विलास गायकवाड (वय 27) नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत तानाजी जगताप (वय 37), 2) तुकाराम चंद्रकांत पाटील (वय 25), 3) शिवाजी सुभाष काटकर (वय 30) सर्व रा.कुई ता.माढा, 4) आनंद पोपट अनंतकवळस रा.कुई ता.माढा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू साठ्यावर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
'वित्त'च्या परवानगीविना शिक्षक भरती! 34 हजार शिक्षकांचे अडकले वेतन

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय वाहन क्र MH-13-B0-0159 या वाहनातून सहा.पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे, सहा.पोलिस फौजदार म.इसाक अय्यास मुजायर, पो हे कॉ. नारायण रामचंद्र गोलेकर, पो कॉ अक्षय सुहास दळवी, चा.पो.कॉ.समिर शेख, पो.कॉ.धनराज विलास गायकवाड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकाचे पेट्रोलिंग करत असताना लऊळ ते कुर्डू रोडवरील कुर्डू हद्दीतील माळरानावर रवि जगताप याचे शेतातील माळरानात एक हायवा टिपर थांबलेला दिसून आला व त्यावर दोन इसम फावड्याने काहीतरी खाली ढकलत असताना दिसल्याने आम्हास हायवा टिपरचा संशय आल्याने टिपर जवळ जाऊन पाहिले असता वाळू असल्याचे दिसून आले. कोणतीही परवानगी नसताना वाळू साठा मिळून आला असे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

अवैध वाळू साठ्यावर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
'डीसीसी'ने शिक्षकांसाठी वाढविली कर्ज मर्यादा! वेतनावर 40 लाखांचे कर्ज

या कारवाईमुळे चोरुन मुरुम, माती, वाळू वाहणाऱ्यावर बिगर नंबर च्या वाहनांकडे आर टी ओ लक्ष देतील का? असा सवाल निर्माण झाला असून या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांकडे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (the local crime branch of solapur has taken action against illegal sand stock in kurdu border)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com