कौन बडा? तौफिकभाई या फारुकभाई!

कौन बडा? तौफिकभाई या फारुकभाई!
कौन बडा? तौफिकभाई या फारुकभाई!
कौन बडा? तौफिकभाई या फारुकभाई!Sakal
Summary

एमआयएममधील अस्वस्थ तौफिकभाईंची जागा आता फारुक शाब्दी यांनी घेतली आहे. पक्षातील जागा घेतली, जनतेच्या मनातील काय?

सोलापूर : 'ओ व्होट कटवे है...' हा एमआयएमवर (MIM) होणारा आरोप 2017 च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएमने खोडून काढला. 'हम व्होट कटवे नही बल्की सियासत के हकदार है'चा मेसेजच एमआयएमने या निवडणुकीत दिला होता. 2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर एमआयएममध्ये प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. एमआयएम रुजविण्यात ज्यांनी मोठा वाटा उचलला ते तौफिक शेख (Tawfiq Shaikh) सध्या राष्ट्रवादीचे (NCP) घड्याळ हातावर बांधण्यासाठी टायमिंग शोधत आहेत. एमआयएममधील अस्वस्थ तौफिकभाईंची जागा आता फारुक शाब्दी (Farooq Shabdi) यांनी घेतली आहे. पक्षातील जागा घेतली, जनतेच्या मनातील काय? याचा फैसला 2022 च्या महापालिका निवडणुकीत होणार आहे. 'कौन बडा? तौफिकभाई या फारुकभाई?' या प्रश्‍नाचेही उत्तर याच निवडणुकीत मिळणार आहे.

कौन बडा? तौफिकभाई या फारुकभाई!
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबरनंतर 13 हजार पदांची भरती

कॉंग्रेसमध्ये असताना 2012 च्या महापालिका निवडणुकीत चावीवाले व राष्ट्रवादीचे उमेदवार हारुण सय्यद यांच्याकडून पराभूत झालेल्या तौफिक शेख यांना सक्षम राजकीय पर्याय नव्हता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच सोलापुरात एमआयएमच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला तौफिक शेख यांच्यासारखा तगडा कार्यकर्ता मिळाला तर कॉंग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या तौफिक शेख यांना एमआयएमसारख्या सक्षम राजकीय पक्षाचा पर्याय मिळाला. एमआयएमने लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमधून तौफिक शेख यांच्या रूपाने दुसऱ्या क्रमांकाची 37 हजारांहून अधिक मते घेतली. त्यानंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने 36 जागा लढवत 9 जागांवर उमेदवार विजयी केले. 7 ते 8 जागांवर एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे.

तौफिक शेख यांच्यामुळे सोलापुरात एमआयएम मोठी झाली? की एमआयएममुळे तौफिक शेख सोलापूरच्या राजकारणात मोठे झाले? या प्रश्‍नाचे उत्तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमधून मिळाले. तौफिक शेख यांच्याशिवाय एमआयएमने फारुक शाब्दी यांच्यासारखा मध्य मतदारसंघाला नवखा असलेला उमेदवार मैदानात उतरविला. शाब्दी यांनी पुन्हा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. तौफिक शेख यांच्यापेक्षा तब्बल एक हजाराहून अधिक मते त्यांनी या निवडणुकीत एमआयएमला मिळवून दिली. एमआयएममध्ये व्यक्तीपेक्षा पक्षाचा झेंडा आणि 'पतंग' महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित झाले. 2019 च्या निवडणुकीत तौफिक शेख निवडणुकीपासून लांब होते, तरीही एमआयएम यशस्वी झाली. 2022 च्या महापालिका निवडणुकीत कदाचित तौफिक शेख एमआयएमच्या विरोधात असतील, त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे व विशेषत: एमआयएमच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून ते आजतागायत फारुक शाब्दी यांनी मतदारसंघातील संपर्क कायम ठेवला आहे. युवक, महिला, विद्यार्थी, वाहतूक, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यासह एमआयएमच्या अनेक विंग त्यांनी काढत त्यांनी एमआयएमला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील रंगीत तालीम म्हणून 2022 च्या महापालिका निवडणुकीकडे एमआयएम आणि शाब्दी पाहात आहेत. राजकारण करताना ज्या काही गोष्टी लागतात, त्या तौफिक शेख यांच्याकडे भरपूर प्रमाणात होत्या. फारुक शाब्दी यांच्याकडेही त्या गोष्टी भरपूर प्रमाणात आहेत. याशिवाय शाब्दी यांच्याबद्दल असलेली प्रतिमा ही त्यांची सर्वात जमेची बाजू मानली जाते.

कौन बडा? तौफिकभाई या फारुकभाई!
सावधान! ध्वनी-वायूप्रदूषण पडेल महागात; भरावा लागेल एक लाखाचा दंड

नांदेडनंतर सोलापूरवर विशेष लक्ष

महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमचे नगरसेवक निवडून यायची सुरवात नांदेड-वाघाळा महापलिकेच्या 2012 च्या निवडणुकीपासून झाली. 2017 च्या नांदेड महापालिका निवडणुकीच्या अगोदर तेथील एमआयएमच्या नगरसेवकांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत एमआयएमचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. सोलापुरातील एमआयएमचे बहुतांश नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत? नांदेड पॅटर्न सोलापुरात चालणार की सोलापूर एमआयएम राज्याला नवीन पॅटर्न देणार? हे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com