अल्पवयीन मुलीला तिघांनी पळवून नेले! तिघेही संशयित नॉट रिचेबल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीला पळविले
अल्पवयीन मुलीला तिघांनी पळवून नेले! तिघेही संशयित नॉट रिचेबल

अल्पवयीन मुलीला तिघांनी पळवून नेले! तिघेही संशयित नॉट रिचेबल

सोलापूर : जुना पुना नाका परिसरातील १६ वर्षीय मुलीला तिघांनी निराळे वस्तीकडे जाणाऱ्या रोडवरील अरविंधधाम येथून वाहनातून पळवून नेल्याची घटना सोमवारी (ता. २५) दुपारी दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी नितीन साहेबराव शिंदे, महेश पोपट दांडगे व नितीन साहेबराव शिंदे (तिघेही रा. रांजणी, ता. पंढरपूर) या संशयितांविरूध्द फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शहर व ग्रामीण भागातून अल्पवयीन मुली, तरूण-तरुणी व महिला पळून (बेपत्ता) जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच जणांचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले. तर अनेकजण अजूनही बेपत्ताच आहेत. दरम्यान, १६ वर्षीय वय असलेली मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद त्या मुलीच्या पालकांनी फौजदार चावडी पोलिसांत नोंदविली. त्याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी संशयितांच्या शोधासाठी एक स्वतंत्र पथक नेमले आहे. त्या पथकाद्वारे त्या संशयित तिघांचा शोध घेतला जात आहे. अल्पवयीन मुलगी अचानक पळून गेल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

पोलिस पथक रिकाम्या हाताने परतले

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या त्या तिघांच्या शोधासाठी फौजदार चावडी पोलिसांचे पथक तातडीने रवाना झाले. त्या तिघांच्या पंढरपुरातील घरी जाऊनही चौकशी केली. पण, पोलिसांना त्याठिकाणी काहीच हाती लागले नाही. त्या तिघांचे फोन बंद असल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. संशयितांना पकडण्यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेतली जात असल्याचे समजते

विवाहितांचाही सासरच्यांकडून छळ

विवाहानंतर काही दिवस चांगला संसार केल्यानंतर किरकोळ कारणावरून विवाहितांचा सासरच्यांकडून छळ केला जात आहे. मागील अडीच वर्षांत जवळपास तीन हजार तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागातही त्याचे प्रमाण वाढले आहे. माहेरून पैसे आण म्हणून छळ केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत.

Web Title: The Minor Girl Was Abducted By Three People Three Suspects Not Reachable Phone

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top