सर्वसामान्यांना देणार 'हिंमत'! गुन्हेगारी नियंत्रणाला प्राधान्य

ग्रामीणमधील सर्वसामान्यांना देणार 'हिंमत'! गुन्हेगारी नियंत्रणाला प्राधान्य
ग्रामीणमधील सर्वसामान्यांना देणार "हिंमत'! गुन्हेगारी नियंत्रणाला प्राधान्य
ग्रामीणमधील सर्वसामान्यांना देणार "हिंमत'! गुन्हेगारी नियंत्रणाला प्राधान्यCanva
Summary

लातूर येथून हिंमत जाधव यांची बदली नुकतीच सोलापूर ग्रामीण पोलिस दलात झाली आहे. मंगळवारी (ता. 21) त्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते पदभार स्वीकारला.

सोलापूर : लोकसंख्येच्या बाबतीत सोलापूर जिल्हा (Solapur) हा मोठा आहे. त्या मानाने क्राईम रेट (Crime Rate) अधिक असणे स्वाभाविक आहे. वस्तुस्थिती अशी असली तरीही जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करण्याबरोबरच गुन्हेगारीवर (Crime) नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य राहील, अशी ग्वाही सोलापूर ग्रामीणचे नूतन अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत हिंदुराव जाधव (Upper Superintendent of Police Himmat Jadhav) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ग्रामीणमधील सर्वसामान्यांना देणार "हिंमत'! गुन्हेगारी नियंत्रणाला प्राधान्य
राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मोहिते-पाटलांची उपस्थिती !

तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या ठिकाणी लातूर येथून हिंमत जाधव यांची नुकतीच सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली झाली आहे. मंगळवारी (ता. 21) त्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. तत्पूर्वी, जाधव यांनी बीड, भंडारा, धुळे, नागपूर, लातूर या ठिकाणी सेवा बजावली आहे. 2004 मध्ये ते पोलिस निरीक्षक या पदावर "प्यारा मेडिकल'मध्ये रुजू झाले होते. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी कृषी अधिकारी म्हणून कोल्हापुरात काम केले. 2012 पासून त्यांची उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) या पदावर वर्णी लागली.

ग्रामीणमधील सर्वसामान्यांना देणार "हिंमत'! गुन्हेगारी नियंत्रणाला प्राधान्य
बांधकाम व्यावसायिक बाबूशेठचा खून की आत्महत्या? करमाळ्यात खळबळ

जाधव हे मूळचे सातारा येथील आहेत. त्यांनी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही काम केले आहे. प्रथमच ते पश्‍चिम महाराष्ट्रात (सोलापूर ग्रामीण) रुजू झाले आहेत. विशेष पोलिस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पोलिस खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेन, असेही त्यांनी या वेळी सांगितले. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी परिवर्तन ऑपरेशन, ग्रामसुरक्षा दल, माझे गाव - माझी जबाबदारी अशा उपक्रमांमधून समाजातील गुन्हेगारी व अवैध व्यवसाय कमी करण्याचा प्रयत्न केला. ते उपक्रम अधिक प्रभावी राबविणे व ते यशस्वी होतील यादृष्टीने आपण काम करू, असेही ते शेवटी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com