esakal | सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा! परराज्यातील विद्यार्थ्यांची झाली सोय
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा! परराज्यातील विद्यार्थ्यांची झाली सोय

विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा! परराज्यातील विद्यार्थ्यांची झाली सोय

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सध्या ऑनलाइन सुरू आहे.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) निर्बंध असल्याने ऑफलाइन परीक्षा होऊ शकत नाहीत. त्यामुळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) सत्र परीक्षा सध्या ऑनलाइन सुरू असून पदवी, पदविका अभ्यासक्रमाचे जवळपास 35 हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. गुरुवार ते रविवार या चार दिवसांत "एमएस्सी'ची परीक्षा पार पडली. जिल्ह्यातीलच नव्हे तर केरळ (Kerala), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) व तमिळनाडूतील (Tamilnadu) 15 ते 20 विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी बसून ही परीक्षा दिली. (The online examination of Solapur University has facilitated the students from other states-ssd73)

हेही वाचा: निलंबित आमदारांना वेतन व भत्ता नाहीच! आमदारांना दरमहा "इतके' वेतन

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने व्यावसायिक अभ्यासक्रम व संशोधनात्मक अभ्यासक्रमावर भर दिला आहे. मागील दीड वर्षात विविध अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केले असून अनेकांना रोजगाराची संधीही त्यातून उपलब्ध झाली आहे. विद्यापीठात पालीसह अन्य भाषाही शिकवल्या जात आहेत. त्यासाठी केरळ, आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांनी सोलापूर विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. एमएस्सीचे शिक्षण परराज्यातील विद्यार्थी विद्यापीठातून घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही, विद्यापीठाने खूप छान नियोजन केल्याचे कौतुकही त्यांनी केले. विद्यापीठाशी संलग्नित 110 महाविद्यालये असून दरवर्षी 70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून परीक्षा घेतली जाते. कोरोना काळात ऑनलाइन परीक्षांचे नियोजन अनेक विद्यापीठांनी महाविद्यालयांकडे सोपविले. परंतु, सोलापूर विद्यापीठाने स्वत:च्या स्तरावरून ही परीक्षा घेतली. ऑनलाइन परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी घेत आठ दिवसांत निकाल लावले आहेत. पदवीच्या अंतिम वर्षाचा निकालही आता दोन दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

हेही वाचा: सीईटीची चिंता नको, सर्वांनाच मिळणार अकरावीला प्रवेश !

दहा दिवसांतच एलएलबी, बीएडचा निकाल

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा सध्या सुरू आहे. सुरवातीला एलएलबी, बीएडच्या विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा पार पडली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा झाल्यानंतर त्या अभ्यासक्रमाचा निकाल विद्यापीठाने सोमवारी जाहीर केला आहे. राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत परीक्षा घेणे आणि तत्काळ निकाल जाहीर करण्यात सोलापूर विद्यापीठ अव्वल राहिले आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत कुलगुरू व प्र-कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा ऑनलाइन घेण्यात येत आहेत. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडूतील 15 ते 20 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा घरबसल्या दिली. एमएस्सी व भाषा संकुलातील ते विद्यार्थी आहेत.

- डॉ. विकास कदम, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

loading image