जिल्हा परिषदेतलं टक्केवारीचं राजकारण !

जिल्हा परिषदेतलं टक्केवारीचं राजकारण !
जिल्हा परिषदेतलं टक्केवारीचं राजकारण !
जिल्हा परिषदेतलं टक्केवारीचं राजकारण !Sakal
Summary

सद्या जिल्हा परिषदेत टक्केवारीचं प्रकरण लईच गाजतंया... नरखेडकरांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचंच ठरवलंय दिसतंया...

सोलापूर : सद्या जिल्हा परिषदेत (Solapur ZP) टक्केवारीचं प्रकरण लईच गाजतंया... नरखेडकरांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचंच ठरवलंय दिसतंया... अध्यक्ष बापूच्या पीएनं कामासाठी पैकं मागितल्याचा आरोप सभापती मोटे यांनी केल्यानं जिल्हाभरात खळबळच उडाली... जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या प्रकरणाचे पडसाद उमटणार हे निश्‍चित हुतं... तसं ते झालंबी... पण सीईओ सायबांनी पीएच्या चौकशीचं आश्‍वासन दिल्यानं हे प्रकरण तात्पुरतं तरी थांबल्यागत जमा हाय... तरीबी टक्केवारीतली आमचं वाटा कुठं हाय असं मात्र इचारण्यात येऊ लागल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागलंया...

जिल्हा परिषदेतलं टक्केवारीचं राजकारण !
Solapur : आमदार प्रणिती शिंदेंच्या मनात आहे तरी काय?

जिल्हा परिषदेच्या टक्केवारीच्या प्रकरणामुळं सभेत थेट वानखेडे सायबाबाबत चर्चा हुऊ लागलीया... राज्य सरकार चौकशीआधीच गुन्हा नोंद करण्यासाठी स्वतःहून फुढं येतया मग रेकॉर्डिंग उपलब्ध असताना पीएसारख्या कारकुनावर कारवाई करण्यासाठी प्रशासन का मागं-फुढं बघतया हे समजना झालंया, असं नरखेडकरदादाचं म्हणणं पडलं... नरखेडकर म्हंजी थेट अन्‌ रोखठोक सवाल करणारं माणूस. कोणाची भीड-भाड न करता सभेत कोणताबी मुद्दा उपस्थित करतंया... अन्‌ चुकलं तर माफीबी मागतंया... नरखेडकरांच्या सवालावर सगळं सभागृह थक्कच झालं... त्येंच्या प्रश्‍नावर अध्यक्ष बापूंचं उत्तर लईच मार्मिक हुतं... टक्केवारीतून सगळं जमा करण्याचं काम आपल्या सर्वांसाठीच हुतं... असं म्हटल्यानं भारतआबा लगीच उठलं अन्‌ माझा वाटा कुठायं म्हनूनशान इचारलं !

जिल्हा परिषदेतलं टक्केवारीचं राजकारण !
MPSC : मागणीपत्रासाठी आता डिसेंबरची मुदत! सरसकट वयोमर्यादा वाढ नाहीच

गेल्या काही दिवसांपास्नं जिल्हा परिषद दोन गोष्टींसाठी लईच गाजू लागलीया... एक तर सीईओ सायबाच्या 'स्वच्छ शाळा सुंदर शाळा' उपक्रम आता राज्यभर जाणार हाय... या उपक्रमाचं शिक्षण इभागाकडनं वाईच कवतुक झालंया... हा इषय चर्चेत असतानाच सोलापूरचं नाव अध्यक्षाच्या पीएनं मागितलेल्या टक्केवारीमदीबी चर्चेत आलंया... सभेत चर्चा झाली... पीएला म्हणणं देण्यासाठी दिलेली मुदत 28 तारखेला म्हंजी आजच संपतीया.. सीईओसायब चौकशी करत असल्याचं सभेत सांगितले पन सभापती मोटे म्हंत्यात आपलं समाधान झालंच नाय... आता आपण लाचलुचपत इरोधी इभागाकडं जाणार हाय... जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्याती... निवडणुकीच्या तोंडावर आता या टक्केवारीच्या प्रकरणामुळं लईच चर्चा अन्‌ राजकारण हुईल यात वाद नाय... पीएनं दिलेल्या खुलाशानंतर सीईओ सायब काय निर्णय घेतील त्यावर फुढचं सगळं अवलंबून राहील, हे मात्र खरं !

- थोरले आबासाहेब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com