आरोग्याधिकाऱ्यांचे छाटले पंख! बदली अन्‌ औषध खरेदीचे काढले अधिकार

आरोग्याधिकाऱ्यांचे छाटले पंख! बदली अन्‌ औषध खरेदीचे काढले अधिकार
Summary

कोरोना काळात कोट्यावधी रुपयांची औषध खरेदी होत असताना अधिकाऱ्यांच्या श्रेयवादातून महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून बदली व औषध खरेदीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत.

सोलापूर : कोरोना (Corona) काळात जवळपास 42 ते 45 कोटींची औषधे (medicines), यंत्रसामुग्री, मास्क, सॅनिटायझरसह अन्य साहित्यांची खरेदी झाली. त्यात कोविड केअर सेंटर, क्‍वारंटाईन सेंटर, कोविड डेडीकेटेड हेल्थ सेंटरसह तेथील रूग्णांच्या जेवणावरील खर्चाचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या रकमेची खरेदी होत असल्याने प्रशासनातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आरोग्याधिकाऱ्यांकडील औषध खरेदी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (Medical officer) बदलीचे अधिकार काढून घेतल्याची चर्चा रंगली आहे. (the right to transfer and purchase medicines has been taken away from the municipal health officers)

आरोग्याधिकाऱ्यांचे छाटले पंख! बदली अन्‌ औषध खरेदीचे काढले अधिकार
'MPSC'ने वर्षापूर्वी शिफारस करुनही 413 उमेदवारांना नियुक्ती नाहीच

औषधांची गरज अन्‌ त्याची संपुष्टात येणारी मुदत यासह अन्य बाबींची पडताळणी आरोग्याधिकाऱ्यांमार्फत होते. त्यांच्याकडून औषध खरेदीचा प्रस्ताव तयार केल्यानंतर आयुक्‍तांच्या मंजुरीने खरेदी केली जाते. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील खरेदीवर आक्षेप घेत त्यातील अनियमिततेबद्दल सभागृहात बोलले गेले. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांची बदली होण्यामागे अशीच कारणे असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे शहरातील कोरोना नियंत्रणात आला, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आयुक्‍तांपुढे मलाच सर्वाधिक किंमत, यातून उपायुक्‍त, सहायक आयुक्‍तांमध्येच श्रेयवाद रंगल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी अधिकाऱ्यांमध्ये राजकारण सुरू असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सांगितले होते.

आरोग्याधिकाऱ्यांचे छाटले पंख! बदली अन्‌ औषध खरेदीचे काढले अधिकार
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही

कोरोना काळात कोट्यवधींची खरेदी होत असताना त्यावर शासनातर्फे वॉच ठेवला जात आहे. मात्र, पाच हजारांच्या आतील वस्तुंच्या किंमती कमी-अधिक करून काही अधिकाऱ्यांनी पैसे लोटल्याचा आरोपही होत आहे. दुसरीकडे आरोग्याधिकाऱ्यांच्या परस्परच वशिलेबाजीतून काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची वा डॉक्‍टरांची बदली केल्याचे प्रकारही घडले असून अजूनही तसे प्रकार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी, औषध खरेदी व वैद्यकीय अधिकारी, डॉक्‍टरांच्या बदलीचे अधिकार आरोग्याधिकाऱ्यांना होते. आता मात्र, बदलीचे अधिकार उपायुक्‍तांकडे तर औषध खरेदीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करून त्याचा पदभार उपायुक्‍त जमीर लेंगरेकर व सहायक आयुक्‍त श्रीराम पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत.

आरोग्याधिकाऱ्यांचे छाटले पंख! बदली अन्‌ औषध खरेदीचे काढले अधिकार
दहावीचा निकाल जुलैमध्ये तर ऑगस्टमध्ये बारावीचा निकाल

'अर्थ'कारणातूनच दोन आरोग्याधिकाऱ्यांची बदली

शहरातील नर्सिंग होम, सोनोग्राफी सेंटरला परवानगी देणे, महापालिकेच्या आरोग्य विभागात डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करणे, औषध खरेदीचा प्रस्ताव तयार करून त्यानुसार खरेदी करणे, नागरी आरोग्य केंद्रांसह महापालिकेच्या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे अधिकार आरोग्याधिकाऱ्यांना होते. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेत तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांची तर आता दुसऱ्या लाटेत डॉ. बिरूदेव दुधभाते यांची बदली करण्यात आली. त्यामागे 'अर्थ'कारण तर नव्हते ना, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. (the right to transfer and purchase medicines has been taken away from the municipal health officers)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com