लुटणारे लगेचच जेरबंद! सोलापुरात दुचाकीवरील गुजरातच्या मॅनेजरला 8 जणांनी आडवून 25 लाख लुटले; 25 लाख रुपयांतील दोन लाख रुपयेच हस्तगत; ‘या’ 8 जणांना अटक

तीन दुचाकीवरील आठ जणांनी त्यांना खाली पाडून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या गाडीतील रोकड घेऊन पसार झाले. ६ जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गुन्हे प्रकटीकरण पथकाने आठही संशयितांना जेरबंद केले.
solapur
cashsakal
Updated on

सोलापूर : गुजरातमधील वीर इंटरप्रायजेस कंपनीचे व्यवस्थापक त्यांच्या गाडीतून २५ लाख रुपये घेऊन जुना पूना नाका परिसरातील घराकडे जात होते. कारंबा नाका परिसरातील गतिरोधकावर त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला. त्यावेळी तीन दुचाकीवरील आठ जणांनी त्यांना खाली पाडून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या गाडीतील रोकड घेऊन पसार झाले. ६ जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गुन्हे प्रकटीकरण पथकाने आठही संशयितांना जेरबंद केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

अहमदाबाद येथील वीर इंटरप्रायजेस कंपनीचे ऑफिस सुरू करण्यासाठी फिर्यादी गजेंद्रसिंह बनुजी चावडा (वय ४८, रा. श्रीराम अपार्टमेंट, जुना पूना नाका) यांनी बाजार समिती परिसरात जागा पाहिली होती. जागेच्या व्यवहारात टोकन देण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ते गेले होते. पण, त्यांचा व्यवहार रद्द झाला आणि ती रक्कम दुचाकीच्या डिक्कीत घालून गजेंद्रसिंह घराकडे निघाले होते. त्यांच्याकडील रक्कम संशयित आरोपीतील काहींनी पाहिली. मित्रांना सांगून आठजण तीन दुचाकीवरून फिर्यादीचा पाठलाग करीत होते. अंधार आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसलेले ठिकाण निवडून त्यांनी गजेंद्रसिंह यांना अडविले. त्यांना दुचाकीवरून खाली पाडून डिक्कीतील रोकड हिसकावून आठ जण पसार झाले. त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील पथकाने गुरुवारी पहाटे सर्व संशयितांना लक्ष्मी मार्केट परिसरातून पकडले. त्यांनी चोरलेल्या २५ लाखातील केवळ दोन लाख रुपयेच पोलिसांना मिळाले आहेत. बाकीची रक्कम त्यांनी कोठे ठेवली, कोणाला दिली, याचा शोध पोलिस घेत आहेत.

‘या’ आठ जणांना अटक

या गुन्ह्यात न्यू पाच्छा पेठेतील शाहीद अब्दुलगनी शेख (वय २७), जमीर रफिक शेख (वय २३), अल्लाबक्ष कादर सय्यद (वय २८), मजहर युन्नुस बागलकोटे (वय २४), समीर राजअहमद सय्यद (वय २६), उमर फारुक जलाल शेख (वय २५), सोहेल हनिफ शेख (२४, रा. इंदिरा नगर, गेंट्याल चौक), मोईन शौकत शेख (वय २६, रा. पाथरूट चौक) या आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील शाहीदविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा, मारामारी करण्याचा पूर्वीचा गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com