अकरावी प्रवेश : सायन्स अन्‌ कॉमर्सलाच विद्यार्थ्यांची पसंती !

अकरावी प्रवेश : सायन्स अन्‌ कॉमर्सलाच विद्यार्थ्यांची पसंती ! 30 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी
अकरावी प्रवेश : सायन्स अन्‌ कॉमर्सलाच विद्यार्थ्यांची पसंती !
Canva
Updated on
Summary

65 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 70 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी सायन्स आणि कॉमर्स शाखेतून अर्ज केल्याचे समोर आले आहे.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) दहावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना मागील गुणवत्तेवरून गुण देण्यात आले आहेत. 65 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 70 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी सायन्स (Science) आणि कॉमर्स (Commerce) शाखेतून अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आर्टस्‌ (Arts) शाखेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात गावोगावी फिरत आहेत. प्रवेशासाठी अर्ज करण्याची गुरुवारी शेवटची मुदत असून, 30 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्ध केली जाणार आहे.

अकरावी प्रवेश : सायन्स अन्‌ कॉमर्सलाच विद्यार्थ्यांची पसंती !
सरकारचा निर्णय ! पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी समिती

अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू झाली असून, काही महाविद्यालयांनी 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे बोलले जात आहे. परंतु, मेरिट यादीनुसारच प्रवेश द्यावा, असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी काढले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत तीन दिवस शिल्लक आहे. विद्यार्थी आपल्या पालकांसह नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 60 टक्‍के तथा त्याहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही विज्ञान शाखेला प्राधान्य दिले आहे. परंतु, त्या शाखेला प्रवेश मिळणार नाही म्हणून बहुतेक विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेसाठीही अर्ज केला आहे. दरम्यान, प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोरोनामुक्‍त गावांमध्ये दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत. सध्या जिल्ह्यातील 301 शाळा सुरू आहेत. कोरोनामुक्‍त गावांमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळल्यानंतर संबंधित गावांमधील शाळा बंद करण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना दिला आहे.

अकरावी प्रवेश : सायन्स अन्‌ कॉमर्सलाच विद्यार्थ्यांची पसंती !
सोलापूर विद्यापीठाच्या 'PET'चा बुधवारी निकाल ! 5 सप्टेंबरला मेरिट यादी

एकाच विद्यार्थ्याचे दोन्ही शाखांसाठी अर्ज

दहावी उत्तीर्ण जिल्ह्यातील जवळपास 63 हजार विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेणार आहेत. विज्ञान शाखेच्या 428 महाविद्यालयांमध्ये 29 हजार 237 जागा आहेत. तर वाणिज्य शाखेच्या 36 हजार 171 जागा असून कला शाखेच्या 11 हजार 328 जागा आहेत. 60 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी कला शाखेला बगल दिली आहे. विज्ञान शाखेतून प्रवेश न मिळाल्यास वाणिज्य शाखेतून प्रवेश मिळावा म्हणून बहुतेक विद्यार्थ्यांनी दोन्हीकडे अर्ज केले आहेत.

अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत 26 ऑगस्टपर्यंत असून 30 ऑगस्टला पहिली तर 3 सप्टेंबरला दुसरी आणि 8 सप्टेंबरला तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. मेरिट यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.

- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Police
Floating Solar Power Project Planned At Solapur Hipparga Lake To Generate Electricity Worth Rs 1 Crore Every Year
solapur city police
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com