श्री विठ्ठल-रुक्‍मिणीमातेचे दागिने वितळवून बनवणार नवीन अलंकार!

श्री विठ्ठल-रुक्‍मिणीमातेचे दागिने वितळवून बनवणार नवीन अलंकार!
श्री विठ्ठल-रुक्‍मिणी
श्री विठ्ठल-रुक्‍मिणीSakal

मंदिर समितीने शासनाच्या विधी व न्याय विभागाला सुमारे 27 किलो वजनाच्या सोन्याच्या वस्तू, दागिने वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली जाणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात (Vitthal-Rukmini Temple) 1985 पासून भाविकांनी सोने आणि चांदीच्या अनेक लहान- लहान वस्तू, कमी वजनाचे दागिने अर्पण केले आहेत. समितीला हे सर्व छोटे दागिने आणि वस्तू पोत्यात भरून ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मंदिर समितीने (Vitthal-Rukmini Mandie Samiti) शासनाच्या विधी व न्याय विभागाला (Department of Law and Justice) सुमारे 27 किलो वजनाच्या सोन्याच्या वस्तू, दागिने वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली जाणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या नियमांना अधीन राहून कार्तिकी यात्रेचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी
अरे देवा! पालखी मार्गावरील वाखरी गावात 23 बिअर शॉपी मंजूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 एप्रिल 2020 पासून कोणतीही यात्रा पंढरपुरात भरू शकलेली नाही. त्यामुळे आताची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या नियमांना अधीन राहून कार्तिकी यात्रेचे नियोजन करण्याचा निर्णय आज मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत भाविकांनी दान स्वरूपात अर्पण केलेल्या 27 किलो सोने आणि 996 किलो चांदीच्या वस्तू वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागण्याचे ठरवण्यात आले.

येत्या 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने शासनाने बहुतांश निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापारी, वारकरी मंडळी आणि लोकप्रतिनिधींनी यात्रा भरवावी, अशी मागणी केली आहे. परंतु शासनाने कार्तिकी यात्रा भरवण्याच्या संदर्भात अद्याप कोणतेही आदेश दिलेले नाहीत. अशा परिस्थितीत आज श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीची यात्रेच्या नियोजनाविषयी बैठक झाली.

बैठकीनंतर अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, 1985 पासून श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात भाविकांना सोने आणि चांदीच्या अनेक लहान लहान वस्तू, कमी वजनाचे दागिने अर्पण केले आहेत. समितीला हे सर्व छोटे दागिने आणि वस्तू पोत्यात भरून ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मंदिर समितीने शासनाच्या विधी व न्याय विभागाला सोन्या- चांदीच्या वस्तू वितळवून त्याच्या विटा करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. तथापि शासनाने अद्याप समितीला परवानगी दिलेली नाही.

भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या चरणी अर्पण केलेले सोन्याचे लहान दागिने आणि वस्तू यांचे एकत्रित वजन 27 किलो असून 996 किलो चांदीच्या लहान लहान वस्तू आहेत. मंदिर समितीचे नूतन कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी या संदर्भात नवीन पत्र तयार केले आहे. शासनाच्या न्याय व विधी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे सोने- चांदी वितळवण्यासाठी परवानगी देण्याविषयी पत्रात नमूद करण्यात आले आहे. परवानगी मिळाल्यावर फक्त त्याच्या विटा करण्याऐवजी श्री विठ्ठल- रुक्‍मिणीस नवीन अलंकार करावेत आणि त्या सोन्या-चांदीचा उपयोग व्हावा असे नियोजन असल्याचे श्री. औसेकर महाराज यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी
Solapur : शहरातील अवैध खासगी सावकारीला ब्रेक

17 एप्रिल 2020 पासून पंढरपुरात यात्रा भरू शकलेली नाही. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी यात्रेसंदर्भात जे निर्देश येतील त्यास अधीन राहून यात्रा भरवावी, यासाठी मंदिर समिती सकारात्मक आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर अशा सर्व नियमांचे पालन करत वारकऱ्यांना मंदिरात मुख दर्शनासाठी सोडण्यात येईल. मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन मंदिर समितीकडून सर्व तयारी केली जाणार आहे. दशमी (ता. 14) पासून ते द्वादशी (ता. 16) पर्यंत ऑनलाइन दर्शनाचे पास बंद ठेवले जातील. या काळात थेट दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणतेही बुकिंग न करता मुखदर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचे श्री. औसेकर यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com