Solapur : जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सुरवात! नऊ दिवसांत वाढले 440 रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सुरवात! नऊ दिवसांत वाढले 440 रुग्ण
सोलापूर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सुरवात! नऊ दिवसांत वाढले 440 रुग्ण

सोलापूर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सुरवात! 9 दिवसांत 440 रुग्ण

सोलापूर : मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुणे (Pune) यासह काही जिल्ह्यांमध्ये Covid-19 रुग्ण वाढू लागले आहेत. त्यातच आता सोलापूर (Solapur) शहर- ग्रामीणचीही भर पडली असून तीन-चार महिन्यांच्या तुलनेत मागील काही दिवसांतील रुग्णवाढ सर्वाधिक आहे. रविवारी (ता. 9) एक हजार 784 संशयितांमध्ये 117 जणांचे रिपोर्ट (Covid test Report) पॉझिटिव्ह आले असून ग्रामीणमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. (The third wave of corona has started in the district and the number of patients is increasing-)

हेही वाचा: विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नका! शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

संशयितांच्या चाचण्या कमी होऊनही पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. रविवारी ग्रामीणमधील 985 संशयितांची टेस्ट पार पडली, त्यात 62 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, तांदूळवाडी (ता. माळशिरस) (Malshiras) येथील 72 वर्षीय पुरुषाचा तर मोहोळमधील गायकवाड वस्तीवरील 57 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच शहरातील 799 संशयितांमध्ये 55 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मोहोळ तालुक्‍यात रविवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर बार्शीत सर्वाधिक 23, माढ्यात 11, माळशिरस तालुक्‍यात नऊ तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात सहा रुग्ण आढळले आहेत. उर्वरित तालुक्‍यांमध्ये पाचपेक्षा कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. बार्शी, माढा, माळशिरस या तालुक्‍यांमध्येच रुग्ण वाढत असल्याची स्थिती आहे.

तर शहरातील प्रभाग क्रमांक सहा, नऊ, 14, 15, 23, 24, 25 आणि 26 मध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण वाढत असतानाही अनेकजण बेशिस्तपणे विनामास्क फिरत असल्याचे रस्त्यावरील चित्र आहे. तर बाजारपेठांमधील गर्दीही कमी झाली नसून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे अजूनही तंतोतंत पालन होत नसल्याने धोका वाढण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. कोरोनाचे संकट वाढणार नाही, याची खबरदारी घेताना नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने (Health Department) केले आहे.

हेही वाचा: सोलापूर : विधवा सुनेचे केलं कन्यादान! शिक्षक दाम्पत्यानं घालून दिला आदर्श

जानेवारीतील स्थिती (1 ते 9 जानेवारी)

  • ग्रामीणमधील टेस्ट : 7,566

  • पॉझिटिव्ह रुग्ण : 252

  • शहरातील टेस्ट : 5,343

  • पॉझिटिव्ह रुग्ण : 188

Web Title: The Third Wave Of Corona Has Started In The District And The Number Of Patients Is Increasing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top