esakal | कुर्डुवाडीत 31 लाखांच्या ठिबक सिंचन संच साहित्याची चोरी 
sakal

बोलून बातमी शोधा

कुर्डुवाडीत 31 लाखांच्या ठिबक सिंचन संच साहित्याची चोरी 

चोरीला गेलेला माल 
चोरट्यांनी गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून आतील आठ लाख पाच हजार 140 रुपये किमतीचे प्लेन पाइपचे 215 बंडल, 10 लाख 97 हजार 250 रुपयांच्या पाइपचे 210 बंडल, 12 लाख 36 हजार 250 रुपयांचा 190 ड्रीप नेट प्रेशर काम्पेन सेंट ट्यूब असे एकूण 31 लाख 32 हजार 640 रुपयांचे साहित्य चोरून नेले. सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे तपास करत आहेत. 

कुर्डुवाडीत 31 लाखांच्या ठिबक सिंचन संच साहित्याची चोरी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुर्डुवाडी (जि. सोलापूर) : बंद गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 31 लाख 32 हजार 640 रुपयांच्या ठिबक सिंचन संच साहित्याची चोरी केली. ही घटना शनिवारी (ता. 15) रात्रीच्या सुमारास कुर्डुवाडी येथे घडली. 
दुकान मालक प्रिया संभाजी माळी (वय 32, रा. सिद्धेश्‍वरनगर, कुर्डुवाडी, मूळ गाव कव्हे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात आज संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात नेटफिम कंपनीचे ठिबक संच प्रोव्हाईड करण्याचा व्यवसाय आहे. यासाठी त्यांच्या दुकानात दोन कामगार आहेत. दुकानासमोर साहित्य ठेवलेले गोडाऊन आहे. कंपनीमार्फत नेटफिम ऍग्रिकल्चर फायनान्स एजन्सीकडून शेतकऱ्यांचा सर्व्हे करून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे व खात्री करून कर्ज मंजूर केले जाते व ठिबकचे साहित्य पुरवले जाते. 

हेही वाचा - लग्नपत्रिका चक्क स्पर्धा परिक्षेच्या जाहिरातीच्या फॉरमॅटमध्ये 

शेतकऱ्यांकडून कागदपत्रे, अटी पूर्तता न झाल्याने फायनान्स स्कीममधील साहित्य गोडाऊनमध्ये पडून होते. फायनान्स स्कीम व्यतिरिक्त इतर बाबतीत वेळोवेळी कंपनीकडे मालाची मागणी करून शेतकऱ्यांना रोख अथवा ऑनलाइन पेमेंट घेऊन विक्री केली जात असे. गोडाऊनमध्ये असे कंपनीकडून आलेले सुमारे 30 ते 32 लाख रुपयांचे साहित्य होते. शनिवारी (ता. 15) संध्याकाळी सात वाजता कामगाराने गोडाऊन व दुकान कुलूप लावून बंद करून फिर्यादींना कळविले. रात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून चोरी केली.

loading image