esakal | लॉकडाउन होईल, अशी कृती नकोच ! ग्रामीणमध्ये आज 66 तर शहरात 27 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

2lockdown_67.jpg

ग्रामीण भागात मागील काही दिवसांमध्ये आज प्रथमच रुग्ण संख्या वाढल्याचे समोर आले एक हजार 450 संशयितांच्या रिपोर्टमध्ये 66 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करमाळा तालुक्‍यातील मिरगव्हाण येथील 73 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे होम क्वारंटाइनपेक्षा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनवर भर देण्याचे जाहीर करूनही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये एकही संशयित नसल्याचे समोर आले आहे. शहरात आज 794 संशयितांमध्ये 27 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 73 वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शहर- जिल्ह्यात आज एकाच दिवसात 93 रुग्ण आढळले असून मागील काही दिवसांतील ही मोठी वाढ आहे.

लॉकडाउन होईल, अशी कृती नकोच ! ग्रामीणमध्ये आज 66 तर शहरात 27 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागात मागील काही दिवसांमध्ये आज प्रथमच रुग्ण संख्या वाढल्याचे समोर आले एक हजार 450 संशयितांच्या रिपोर्टमध्ये 66 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करमाळा तालुक्‍यातील मिरगव्हाण येथील 73 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे होम क्वारंटाइनपेक्षा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनवर भर देण्याचे जाहीर करूनही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये एकही संशयित नसल्याचे समोर आले आहे. शहरात आज 794 संशयितांमध्ये 27 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 73 वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शहर- जिल्ह्यात आज एकाच दिवसात 93 रुग्ण आढळले असून मागील काही दिवसांतील ही मोठी वाढ आहे.

उपचार घेणारे तालुकानिहाय रुग्ण
माळशिरस 105, अक्कलकोट 18, बार्शी 62, करमाळा 68, माढा 66, मंगळवेढा 11, उत्तर सोलापूर 16, मोहोळ 33, पंढरपूर 53, सांगोला 24, दक्षिण सोलापूर 41 अशाप्रकारे जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये सध्या एकूण 497 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ग्रामीण भागातील पाच लाख 14 हजार 77 संशयितांची आतापर्यंत कोरोना टेस्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 40 हजार 637 कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण रुग्णांपैकी एक हजार 184 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या 497 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दररोज तीन हजार संशयितांची टेस्ट करण्याचे उद्दिष्ट असतानाही सरासरी दीड हजार संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे. जिल्ह्यात विना मास्क तथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे या पार्श्वभूमीवर बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्‍यांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आज (मंगळवारी) अक्कलकोट तालुक्‍यात तीन, बार्शीत 12, करमाळा चार, माढा 19, माळशिरस नऊ, मंगळवेढ्यात दोन, उत्तर सोलापुरात दोन, मोहोळ तालुक्‍यात चार, पंढरपूर तालुक्‍यात सात, सांगोला तालुक्‍यात तीन तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात एक रुग्ण वाढला आहे. रुग्णंसख्या वाढू नये म्हणून प्रत्येकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, स्वच्छता ठेवावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे आरोग्याधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी केले आहे.

 

शहरात याठिकाणी आढळले रुग्ण
वसंत विहार, स्वामी विवेकानंद नगर, मेहता रेसिडेन्सी, कोटणीस नगर (विजयपूर रोड), एसआरपीएफ कॅम्प (सोरेगाव), रेल्वे लाईन (जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ), आकाशवाणी केंद्राजवळ, भावना अपार्टमेंट (रेल्वे लाईन्स), जुनी मिल चाळ (मुरारजी पेठ), शुक्रवार पेठ, शिवम अपार्टमेंट (सम्राट चौक), शिवगंगा कॉम्प्लेक्‍स (पश्‍चिम मंगळवार पेठ), बॅंक ऑफ कॉलनी (जुळे सोलापूर), द्वारका नगर, गांधी नगर (दक्षिण सदर बझार), कर्णिक नगर, एकता नगर, जुना पुना नाका, शाहीर वस्ती, जुना बर्फ कारखान्याजवळ (रेल्वे लाईन), कुर्बान हुसेन नगर (गुरुनानक चौक) आणि शेखर वस्ती (देगाव) येथे नवे रुग्ण आढळले आहेत. शहरातील एक लाख 76 हजार 496 संशयितांमध्ये आतापर्यंत 12 हजार 483 रुग्ण आढळले असून त्यातील 662 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात होम क्‍वारंटाईनमध्ये 94 तर इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये 36 आणि होम आयसोलेशनमध्ये पाचजण आहेत.