

सोलापूर : नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईतून सोलापूर आलेला अमन फय्याज शेख (वय १९, रा. कसाईवाडा, कोहिनूर सिटी, आग्रा रोड, मुंबई) हा पाच दिवस सोलापुरातील नई जिंदगीतील नातेवाइकांकडेच राहिला. नशा करून तो अपार्टमेंटमधील बंद घरे शोधून तेथे चोरी करतो होता. त्यानेच जोडभावी पेठेतील शिक्षिकेच्या घरातून पावणेपंधरा लाखांचा ऐवज चोरल्याची बाब समोर आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद करीत १४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.