Solapur : चोरटा शिरला अन्‌ दुकानात झोपलेल्यांनी पकडलाच; दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली

शटर तोडून दुकानात शिरल्यावर त्या दोन्ही भावांनी त्याला जागेवरच पकडले. पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याने अनिल याच्या हातास चावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गोंधळामुळे गावातील काही लोक त्याठिकाणी आले आणि चोरट्याला बेदम चोप दिला.
The thief, who was found sleeping inside the shop after breaking in, is now in police custody for two days.
The thief, who was found sleeping inside the shop after breaking in, is now in police custody for two days.sakal
Updated on

सोलापूर : दुकानाचे एका शटरला कुलूप लावून दुसरे शटर आतून बंद करून दोघे भाऊ दुकानात झोपले होते. दुकान बंद असल्याचे पाहून चोरट्याने कटावणीने कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यावेळी दुकानात झोपलेल्या वैभव बापू खुडे व अनिल खुडे (रा. जाधववाडी, ता. माळशिरस) या दोघांनी त्या चोरट्याला जागेवरच पकडले. माळशिरस पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. विशाल संभाजी पवार (रा. उमराणी, ता. जत, सांगली) असे त्या संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com