The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
sakal
मोहोळ - अज्ञात चोरट्यांनी मोहोळ तालुक्यातील विविध देवतांची मंदिरे चोरीसाठी लक्ष केली असून, बोपले, ता. मोहोळ येथील सोमलिंग मंदिरातील अंदाजे 50 हजार रुपये किमतीच्या देवाच्या चांदीच्या पादुका अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना शनिवार ता. 10 ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मोहोळ पोलीसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.