राज्यस्तरीय हिंदी अधिवेशन गोवा येथे ! सोलापूरच्या 30 शिक्षकांची "भाषारत्न'साठी निवड 

Shikhak Parishad.
Shikhak Parishad.
Updated on: 

सोलापूर : गोवा हिंदी अकादमी पुरस्कृत राज्यस्तरीय हिंदी प्रचार व प्रसार संमेलनाचे आयोजन 19, 20 व 21 फेब्रुवारी 2021 रोजी पणजी, मीरामार येथील हॉटेल सोलमार सभागृहात पार पडणार आहे. गोवा येथील राज्यस्तरीय हिंदी प्रचार - प्रसार संमेलनासाठी सोलापूर जिल्ह्यातून हिंदी शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 30 हिंदी विषय शिक्षकांना "भाषारत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य समन्वयक सुरेश कोडग यांनी दिली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक प्रभाकर ढगे राहणार आहेत. संमेलनाचे उद्‌घाटन गोव्याचे कला, सांस्कृतिक आणि सहकार व आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते होणार आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक, माजी केंद्रीय कायदा मंत्री व गोव्याचे उपमुख्यमंत्री ऍड. रमाकांत खलफ, गोव्याचे माजी क्रीडा व कृषिमंत्री रमेश तवडकर, गोव्याचे शिक्षण संचालक भगीरथ शेटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोवा हिंदी अकादमीचे अध्यक्ष सुनील शेट आहेत. 

संमेलनामध्ये चर्चासत्र, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण, हिंदी भाषेचे महत्त्व, "भाषारत्न' पुरस्कार वितरण करण्यात येणार असून, या वेळी काही महत्त्वपूर्ण ठरावही मांडले जाणार आहेत. महाराष्ट्रातून 100 हिंदी विषय शिक्षकांची निवड या संमेलनासाठी करण्यात आली असल्याची माहिती राज्य संमेलनाचे मुख्य संयोजक कैलास जाधव आणि सुरेश कोडग यांनी दिली. 

संमेलनाचे मुख्य संयोजक कैलास जाधव, राज्य समन्वयक सुरेश कोडग, सहसमन्वयक उस्मान मुलाणी, संमेलन नियोजन प्रमुख एम. आय. तांबोळी, सहसंयोजक राजूदास पवार, संमेलन नियंत्रक सुभाष खरबस, सोलापूर जिल्हा समन्वयक हरून बंदूकवाले आदींनी या संमेलनासाठी नियोजन केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Panchayat Samiti Member Komal Doke Faces Action as Kunbi Caste Certificate Found Fake During Official Verification
Maharashtra School Admission Update Private Schools to Follow Lottery System and New Age Criteria for Student Admissions
kalpana mahapure
Rural Education Achievement